फक्त ‘मेलानिया’च नव्हे, मुलगी ‘इवांका’ तसेच जावई देखील डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर भारत दौर्‍यावर येणार ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा सोमवारपासून भारत दौरा सुरु होणार आहे. नवी दिल्लीपासून तर अहमदाबादपर्यंत त्यांच्या दौऱ्याची तयारी केली जात आहे. ट्रम्प यांच्या सोबत त्यांची पत्नी मेलानिया देखील येणार आहे, एवढेच नाही तर ट्रम्प यांची मुलगी इवांका आणि जावई जारेड देखील शिष्टमंडळात सहभागी होणार आहेत. ट्रम्प हे २४ आणि २५ फेब्रुवारी ला भारतात राहणार आहेत.

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमवेत एक मोठे शिष्टमंडळ देखील भारतात येणार आहे. ज्याचा द्विपक्षीय चर्चेत समावेश केला जाणार आहे.

इवांका ट्रम्प यांचा हा दुसरा भारत दौरा असणार आहे, याआधी त्या एका जागतिक कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून हैदराबादला आल्या होत्या. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदीही या कार्यक्रमाचा भाग बनले आणि दोन्ही नेत्यांनी रोबोटशी संवाद साधला.

अमेरिकन प्रतिनिधीमंडळात कोणाचा समावेश असेल ?

– डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेचे राष्ट्रपती

– मेलानिया ट्रम्प, अमेरिकेची पहिली महिला

– इवांका ट्रम्प, अमेरिकेच्या राष्ट्रपतींची मुलगी आणि सल्लागार

– जारेड कुशनर, अमेरिकेच्या राष्ट्रपतींचे जावई आणि सल्लागार

– रॉबर्ट लायथिझर, ट्रेड रिप्रेंजेटिव

– रॉबर्ट ओ ब्रायन, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार

– स्टीव्ह म्नूचिन, कोषाध्यक्ष सचिव

– विल्बर रॉस, वाणिज्य सचिव

– मिक मुलेनेव्ही, बजेट-व्यवस्थापन सचिव

डोनाल्ड ट्रम्प यांचा हा पहिला भारत दौरा आहे आणि या वेळेस त्यांचे पूर्ण कुटुंब देखील सोबत येणार आहे. अमेरिकेचे राष्ट्र्पती सर्वात आधी अहमदाबादला जाणार आहेत, तेथे साबरमती आश्रमात ते जाणार आहेत. यानंतर ते नमस्ते ट्रम्प या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत, जेथे १ लाखापेक्षा अधिक लोक सहभागी होणार आहेत.

एक कोटी लोक होणार सहभागी ?

डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी अहमदाबाद विमानतळ ते मोतेरा स्टेडियमपर्यंतच्या रोड शोमध्ये भाग घेतील. भारतात येण्यापूर्वी ट्रम्प यांनी दावा केला की त्यांच्या स्वागतासाठी दहा दशलक्षाहून अधिक लोक उपस्थित असतील, ही संख्या ६ ते १० दशलक्ष असू शकते. डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी ५ दशलक्ष आणि ७ दशलक्ष इतका दावा केला आहे.

You might also like