WhatsApp मॅसेजमध्ये आलेल्या ‘या’ लिंकवर चुकूनही करू नका क्लिक, सरकारने दिला इशारा

नवी दिल्ली : कोरोना महामारीदरम्यान, देशात एक व्हॉट्सअ‍ॅप मॅसेज खुप सर्क्युलेट होत आहे. या मॅसेजसोबत एक लिंक तुम्हाला शेयर केली जाईल, ज्यामध्ये तुम्हाला लिंकवर क्लिक करण्यास सांगितले जाईल. मॅसेजमध्ये सांगितलेले असेल की, तुम्हाला कोरोना महामारी काळात सरकारकडून मदत निधी दिला जात आहे. जाणून घ्या तुम्ही निधी कसा मिळवू शकता. जर तुमच्या व्हॉट्सअपवर असा मॅसेज आला तर सावध रहाण्याची गरज आहे.

सरकारकडून सर्व यूजर्सला अशाप्रकारच्या फेक मॅसेजपासून सावध रहाण्याचा इशारा देण्यात आला आहे. कारण हा फेक मॅसेज आहे, जो हॅकर्सद्वारे सर्क्युलेट केला जात आहे. हॅकर्स याचा फायदा घेऊन तुम्हाला जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्ही अशाप्रकारच्या कोणत्याही मॅसेजवर क्लिक करणे टाळा. सरकारसुद्धा वेळावेळी यूजर्सला अलर्ट करत आहे. मात्र, सायबर विभागाकडून यावर कोणतीही उपाययोजना होताना दिसत नाही.

सरकारने जारी केला अलर्ट
सरकारकडून पीआयबी फॅक्ट चेकच्या ट्विटर हँडलवर माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये अशा कोणत्याही प्रकारच्या मॅसेजला फेक असल्याचे सांगण्यात आले आहे. सरकारकडून सांगण्यात आले आहे की, कोविड 19बाबत असा कोणताही फंड जारी केलेला नाही. यामुळे यूजर्सने अलर्ट रहावे. ट्विटमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, चुकूनही हा मॅसेज फॉरवर्ड करू नका. याशिवाय अशा कोणत्याही लिंकवर क्लिक न करण्याचा सल्ला दिला आहे. सरकारने इशारा दिला आहे की, अशाप्रकारचा मॅसेज तुमचा फोन हॅक करू शकतो. तुमचा डाटा चोरी करून बँक अकाऊंटमधून पैसे गायब होऊ शकतात.

खोट्या मॅसेजपासून असे रहा दूर
1-अशा मॅसेजपासून दूर राहण्यासाठी खुप सतर्क रहा.
2-व्हॉट्सअपवर कोणत्याही अनोळखी नंबरवरून आलेल्या मॅसेजवर विश्वास
ठेवू नका.
3-प्रत्येक लिंकवर क्लिक करणे टाळा.
4- कुणालाही असा मॅसेज फारवर्ड करू नका.
5- कुणालाही व्हॉट्सअपवर बँक अकाऊंट डिटेल्स शेयर करू नका.

You might also like