‘भारत असुरक्षित देश, क्रिकेट सामना खेळवू नका’, पाकचा जावेद मियाँदाद ‘बडबडला’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्याच्या घडीला भारत हा सर्वात असुरक्षित देश आहे असं वक्तव्य पाकिस्तानचे माजी कर्णधार जावेद मियाँदाद यांनी केलं आहे. इतकेच नाही तर भारत असुरक्षित असल्यानं भारतात एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळवला जाऊ नये अशी मागणीही त्यांनी आयसीसीकडे केली आहे. याबाबत त्यांनी आयसीसीला पत्र लिहलं आहे.

जावेद आपल्या पत्रात म्हणतात, “सध्याच्या घडीला भारताच्या जवळपास सगळ्याच राज्यांमध्ये आंदोलनं सुरू आहेत. काही ठिकाणी हिंसाही पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही संघानं भारतात जाऊ नये. कारण त्यांच्या सुरक्षेला धोका पोहचू शकतो. त्यामुळे आयसीसनं भारतात एकही सामना खेळवू नये.”

काही दिवसांपूर्वी पाकच्या क्रिकेट मंडळानं भारतावर जोरदार टीका केली होती. यानंतर बीसीसीआयनं पाकला जोरदार चपराक लगावली होती. बीसीसीआयनं म्हटलं होतं की, “पाकिस्तानबरोबर आम्ही कोणताही द्विदेशीय सामना खेळणार नाही. त्याचबरोबर पाकिस्तानमध्येही खेळायला जाणार नाही. कोणतीही मोठी स्पर्धा पाकिस्तानसोबत घ्यायला आयसीसी धजावत नाही. आता तर बांग्लादेशमध्ये पाकिस्तानसोबत खेळणार नाही” असा निर्णय बीसीसीआयनं घेतला. बीसीसीआयनं पाकला मोठा धक्का दिला. परंतु आता पाकिस्तान नेमकं काय करणार याची उत्सुकता मात्र सर्वांनाच असेल.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/