घराच्या मागील दाराने आत घुसला पती तर प्रियकराबरोबर आक्षेपार्ह स्थितीत आढळली पत्नी, केली दोघांची हत्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : दिल्लीत राहून पैसे कमविणारा व्यक्ती आपल्या गावी घरी पोहोचला तेव्हा पत्नीने दार उघडले नाही. जरा संशयास्पद वाटल्याने तो मागील दरवाजाद्वारे घरात घुसला, तेव्हा पत्नी आणि तिचा प्रियकर आक्षेपार्ह स्थितीत आढळले. रागाच्या भरात त्या व्यक्तीने धारदार शस्त्राने दोघांना ठार मारले. ही खळबळजनक घटना बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील आहे.

नालंदा जिल्ह्यातील थरथरी पोलिस स्टेशन परिसरातील रूपनबीघा गावात दुहेरी खून झाल्याने खळबळ उडाली. असे म्हटले जाते की, पतीला आपल्या प्रियकराबरोबर आक्षेपार्ह परिस्थिती पाहिल्यानंतर दोघांना धारदार शस्त्राने कापून त्यांची हत्या केली. मृतक प्रियकर निशांतकुमार उर्फ ​​छोटू हा हिलसा पोलीस ठाणे परिसरातील धरमपूर गावचा रहिवासी आहे, तर मृता रेखा देवी, सबलू कुमारची 32 वर्षीय पत्नी आहे. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार सबलू दिल्लीत राहूून पैैसे कमवत असे. बुधवारी तो आपल्या गावी आला. घरी पोहोचल्यावर दार उघडण्यचा प्रयत्न करत असताना पत्नीने दरवाजा उघडला नाही. यामुळे त्याला संशयास्पद वाटले, यानंतर, संशयाच्या आधारे पती गुप्तपणे घराच्या मागील बाजूने घुसला, आणि पत्नीला दूूूसऱ्या पुरुषासह आक्षेपार्ह स्थितीत पाहिले. हे पाहून तो संतापला आणि त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला

या वादानंतर नवऱ्याने संतप्त होऊन खोलीत ठेवलेल्या धारदार शस्त्राने दोघांवर हल्ला केला, यामुळे दोघांचा जागीच मृत्यू झाला. खून केल्यावर तो गावातून पळाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि दोघांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी सदर रुग्णालयात पाठविले. नालंदाचे कायदा व सुव्यवस्था डीएसपी संजय कुमार यांनी सांगितले की सबलूच्या घरी दोन लोकांचा खून झाल्याची माहिती मिळाली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. प्रकरण लवकरच समोर येईल.