Dr. Baba Adhav | ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांना 92 व्या वर्षी कॅन्सर, केले ‘हे’ आवाहन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्राच्या परिवर्तनवादी सत्यशोधक चळवळीतील झुंजार नेतृत्व असलेल्या ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव (Dr. Baba Adhav) यांना वयाच्या 92 व्या वर्षी कॅन्सरची लागण (Cancer infection) झाली आहे. त्यांनी एक निवेदन जारी केले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की, वय वर्षे 92 सुरु आहे, हाडे ठिसूळ झालीत, मणकाही त्रास देतोय, निसर्ग नियमाप्रमाणे वाढत्या वयाबरोबर काही व्याधी मागे लागल्या आहेत, असं सांगत कॅन्सरची लागण झाल्याचे डॉ. बाबा आढाव (Dr. Baba Adhav) यांनी सांगितले आहे. तसेच लवकर मी या आजारावर मात करेन, असा विश्वासही डॉ. बाबा आढाव यांनी व्यक्त केला आहे.

काय म्हटले निवेदनात

माझ्या भावंडांनो, सध्या मी घरीच आहे. त्याचं कारण मी थोडा आजारी आहे. आजाराचं कारण जे आहे ते तुम्हाला कळावं त्यासाठी माझं हे छोटेसे निवेदन तुम्हा सर्वांच्या माहितीकरिता. सध्या मला 92 वर्षे चालू आहे. तरीसुद्धा माझी तब्येत अत्यंत सुदृढ आहे. परंतु निसर्ग नियमाप्रमाणे वाढत्या वयाबरोबर काही व्याधीही मागे लागल्या आहेत. हाडे ठिसूळ झाली आहेत आणि अश्या ठिसूळ झालेल्या पाठीचा मणका (Spinal cord) त्रास देतोय. त्याची योग्य ती आधुनिक तपासणी झाली आहे.

Pune Crime | पुण्याच्या मार्केटयार्डमध्ये डाळींब पॅकिंगवरुन तरुणावर तलवारीने वार; जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या 5 जणांना अटक

तपासणीत हाडांच्या ठिसूळपणा बरोबरच काहीशी कॅन्सर सारख्या व्याधीची लागण झाल्याचे उजेडात आले आहे. 92 वर्षात उपचाराला मर्यादा आहेत. अभिजीत वैद्य (Abhijeet Vaidya) हे माझे कुटुंब डॉक्टर आहेत. त्यांच्या सल्ल्याप्रमाणे तसेच डॉ.राजेंद्र कोठारी (Dr. Rajendra Kothari), डॉ. विजय रमणम (Dr. Vijay Ramanan) या सर्वांनी उपचाराची शर्थ चालवलेली आहे. माझ्या मते हे सगळं निसर्ग नियमाप्रमाणे घडतंय, त्यासाठी आगळं वेगळं काही करण्याची गरज नाहीये. त्यावर योग्य ते उपचार सुरू आहेत.

मात्र माझ्या (Dr. Baba Adhav) हालचालीवर मर्यादा आलेल्या आहेत. माझी खात्री आहे की मी यातून बाहेर पडेल व माझं रुटीन सुरू राहील. कृपया आपण कोणीही चिंता बाळगू नये व मला भेटण्याची घाई करू नये. कारण या आजारामूळे व त्यावरील औषधोपचारामूळे व्यक्तीची प्रतिकारशक्ती (Immunity) कमी होत जाते. आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन होणं माझ्या तब्येतीला धोकादायक ठरू शकते. बसल्या जागेवरून जे काय सहकार्य तुम्हाला करता येईल ते ऑनलाईन करेन. वेळोवेळी मी तुम्हाला तब्येतीची खुशाली कळवत राहीलच, असे डॉ. बाबा आढाव (Dr. Baba Adhav) यांनी म्हटले आहे.

हे देखील वाचा

Mumbai Cruise Drug Case | नवाब मलिक यांच्या आरोपानंतर आणखी एका मंत्र्याचा पाठिंबा, फोटो ट्विट करत विचारला ‘हा’ सवाल

Aryan Khan Drug Case | भाजपा नेत्याचा मोठा दावा ! प्रभाकर साईलनं समीर वानखेडेंवर पैसे घेतल्याचा खोटा आरोप केला? पहा ‘स्टिंग ऑपरेशन’चा व्हिडीओ

Pune Corporation GB | नदीकाठ सुधार योजनेचे 3 टप्प्यांचे काम होणार पीपीपी तत्वावर; 700 कोटी रुपयांचे एका टप्प्याचे काम पालिका निधीतून तर उर्वरित 2 टप्पे ‘पीपीपी’मधून करण्याचा निर्णय

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Dr. Baba Adhav | Senior social worker Dr. Baba Adhav was diagnosed with cancer at the age of 92

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update