Pune Crime | पुण्याच्या मार्केटयार्डमध्ये डाळींब पॅकिंगवरुन तरुणावर तलवारीने वार; जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या 5 जणांना अटक

पुणे : Pune Crime | मार्केटयार्डमध्ये (Marketyard) डाळींब पॅकिंगच्या कामावर आलेल्या तरुणाला तुमच्यामुळे आमच्या मुलांना रोजगार मिळत नाही, असे म्हणून तलवारीने वार करुन जीवे मारण्याचा (Attempt to Murder) प्रकार घडला. याप्रकरणी मार्केटयार्ड पोलिसांनी ६ जणांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून पाच जणांना अटक (Pune Crime) केली आहे.

अतुल शिंदे (वय २७), तौसिक खान (वय २७), जहीर शेख (वय २८), विकास ढवळे (वय २७), सायबा कोळी (वय २६) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी आतिश गुलाब शिरसाट (वय २३, रा. आंबेडकरनगर, मार्केटयार्ड) यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात (गु. र. नं. १४७/२१) फिर्याद दिली आहे. हा प्रकार आंबेडकरनगर येथील गॅस गोडाऊनजवळ रविवारी पहाटे दोन वाजता (Pune Crime) घडला.

Pakistan captain Babar Azam | कुराणवर हात ठेवून बाबर आझमच्या ’गर्लफ्रेंड’ने घेतली शपथ, म्हणाली – ’10 वर्षापर्यंत शोषण करत होता पाकिस्तानी कर्णधार’

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्केटयार्डमध्ये डाळींबाचा मोठा व्यापार चालतो.
शेतकर्‍यांकडून आलेली डाळींब बॉक्समध्ये टाकून त्यांचे पॅकिंग करण्यासाठी पहाटेपासून अनेक जणांची गरज (Pune Crime) असते. आतिश शिरसाट व त्यांच्याबरोबर काही मुले हे काम करतात.
तसेच आरोपी हे बिबवेवाडी व आंबेडकरनगर येथे राहणारे आहेत.
पॅकिंगसाठी जास्त जण आल्याने अनेकांना दररोज रोजगार मिळतोच असे नाही.
रविवारी मोठ्या प्रमाणावर माल येत असतो.
त्यामुळे पॅकिंगचे काम करणार्‍या या तरुणांमध्ये काम मिळण्यावरुन वाद सुरु होते.
आतिश शिरसाट हे रविवारी पहाटे कामाला जात असताना आरोपींनी त्यांना वाटेत अडविले.
उद्यापासून तुझ्या मित्रांसोबत मार्केटयार्ड येथे डाळींब पॅकिंगचे कामास येऊ नको.
तुमच्यामुळे आमच्या मुलांना रोजगार मिळत नाही, असे म्हणून त्यांनी शिरसाट यांना शिवीगाळ (Pune Crime) करुन त्यांच्या डोक्यात, पाठीवर तलवारीने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
सहायक पोलीस निरीक्षक मुंढे तपास करीत आहेत.

हे देखील वाचा

Aryan Khan Drug Case | भाजपा नेत्याचा मोठा दावा ! प्रभाकर साईलनं समीर वानखेडेंवर पैसे घेतल्याचा खोटा आरोप केला? पहा ‘स्टिंग ऑपरेशन’चा व्हिडीओ

Pune Corporation GB | नदीकाठ सुधार योजनेचे 3 टप्प्यांचे काम होणार पीपीपी तत्वावर; 700 कोटी रुपयांचे एका टप्प्याचे काम पालिका निधीतून तर उर्वरित 2 टप्पे ‘पीपीपी’मधून करण्याचा निर्णय

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Crime | Attempt to murder of youth in marketyard area of pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update