Drinking Tea In The Morning | सकाळी झोपेतून उठल्यानंतर चहा पिता का?; आरोग्याचे होऊ शकते नुकसान, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Drinking Tea In The Morning | अनेक जणांना सकाळी झोपेतून उठल्यानंतर चहा (Tea) हवा असतो. चहा नाही घेतल्यास दिवस खराब जातो. काही जण तर दात न घासताच चहा पित असतात. गरम-गरम चहा पिल्याने तेव्हा फ्रेश देखील वाटतं. मात्र, आरोग्याच्या दृष्टीने सकाळी रिकाम्या पोटी चहा पिणे अजिबात चांगले नसते. रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या नंतर जाणवत असतात (Health Problems Occur Due To Drinking Tea On An Empty Stomach). सकाळी काही न खाता चहा प्यायल्याने आरोग्यावर परिणाम (Drinking Tea In The Morning) दिसून येतो. याबाबत जाणून घ्या.

 

ताण तणाव वाढतो (Stress Increases) –
चहा प्यायल्याने आपल्याला किती ही फ्रेश वाटत असलं तरी ही चहाने शरिरातील साखरेचे प्रमाण वाढते. चहाने ताण अधिक वाढतो. चहामध्ये कॅफीन असते ते प्यायल्याने झोप जाते. मात्र, त्यामुळे स्ट्रेस ताण, तणाव कमी होत नाही तर तो अधिक वाढतो. असं तज्ज्ञ म्हणतात. (Drinking Tea In The Morning)

 

साखरेचे प्रमाण वाढते (Increases Sugar Content) –
चहामध्ये साखर असते. सकाळ सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने शरिरातील साखरेची पातळी वाढण्याची शक्यता असते. त्याने डायबिटीज (Diabetes) होण्याची शक्यता बळावते. इतकंच नाही तर भविष्यात शरीरावर वाईट परिणाम ही चहाचे होत असतात.

 

माऊथ अल्सर (Mouth Ulcers) –
अल्सर म्हणजेच साधारणपणे आपण याला तोंड येणं असं म्हणतो. रात्री जेवणानंतर ६ ते ७ तास पोट रिकामे असते. त्यानंतर सकाळी झोपेतून उठल्या नंतर लगेच चहा प्यायल्याने पोटातील आम्ल पित्त खवळते. त्याने अल्सरची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे सकाळी झोपेतून उठल्या-उठल्या रिकाम्या पोटी चहा पिणे टाळणे कधीही उत्तम असते.

अपचनाच्या तक्रारी वाढू शकतात (Complaints Of Indigestion May Increase) –
सकाळी झोपेतून उठल्या उठल्या चहा प्यायल्याने पोट साफ होते. मोशन होण्यास मदत होते असं अनेकाना वाटते.
मात्र चहामुळे गॅसची तक्रार वाढते. चहाच्या अतिसेवनामुळे पचनक्रिया मंदावते आणि पोटाच्या तक्रारी (Indigestion And Stomach Problems) सुरू होतात.
त्यामुळे दिवसभरात तुम्ही चहा दोन ते तीन वेळा पित असाल तर ठिक आहे.
पण सकळ सकाळी काही न खाता पिता चहा घ्यायची सवय तुम्हाला असेल तर अपचनाच्या तक्रारी वाढू शकतात.

 

ब्लड प्रेशर (Blood Pressure) –
ब्लड प्रेशरचा त्रास असलेल्या लोकांनी बेड टी (Bed Tea) घेऊ नये. कारण चहा शरीरासाठी गरम असतो.
त्यात असलेले घटक कॅफीन शरीरात मिसळते. त्याने शरीरातील ब्लड प्रेशर आणखी वाढण्याची शक्यता असते.
ब्लड प्रेशर अनेक शारीरिक आजारांचे मूळ असल्याने ब्लड प्रेशर वाढणे आजिबात चांगलं नसतं.
ब्लड प्रेशर (Blood Pressure) वाढल्यास शारीरिक समस्या वाढतात.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Drinking Tea In The Morning | do you drink tea empty stomach as soon as you wake up in the morning

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Morning Breakfast | एनर्जी आणि इम्युनिटीसह हॅप्पीनेस सुद्धा देतो सकाळचा नाश्ता, येथे जाणून घ्या याचे 5 फायदे

 

Amla Muramba | सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याचा मुरंबा खाल्ल्याने होईल आरोग्याला फायदा; जाणून घ्या

 

Weight Loss | जिद्दीच्या ’ट्रेडमिल’वर स्वार होऊन खाणे केले कंट्रोल; डॉक्टरने 2 वर्षात 194 वरून 84 किलो केले वजन