पैशांचा पाऊस पाडणार्‍या मांत्रिकांचा पर्दाफाश, ५ जण अटकेत

बीड : पोलीसनामा ऑनलाईन

अघोरी कृत्य करून पैशांचा पाऊस पाडतो, असे सांगणार्‍या पाच मांत्रिकांना बीडच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने अटक केली. मांत्रीकांना घरामध्ये पुजा सुरु असताना रंगेहाथ अटक करण्यात आली. ही कारवाई बीड जिल्ह्यातील समनापुर येथील गोरे वस्तीवर गुरुवारी (दि.३०) रात्री बाराच्या सुमारास करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी एक स्कॉरपिओ (एमएच १२ जीव्ही ६६६२) जप्त करुन बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध जादूटोणा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
[amazon_link asins=’B01FM7GGFI’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c89368d9-acfc-11e8-b7c9-913983b1f6f1′]

दरोडा प्रतिबंधक विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक गजानन जाधव हे पथकासह बीड ग्रामीण हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी जाधव यांना समनापुर येथील गोरे वस्तीवर राहणारे राजाभाऊ अंबादास गोरे यांच्या घरी पैशांचा पाऊस पाडण्यासाठी पाच जण आले असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. पथकाने राजाभाऊ गोरे यांच्या घरावर छापा टाकला असता त्याठिकाणी हळदी-कुंकू, लिंबू, नारळ, तांदूळ, कापड अशा साहित्यांची मांडणी करुन पुजा सुरु होती. पथकाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पूजा घालत असणाऱ्या पाच जणांना रंगेहाथ अटक केली.

राफेल करारात आणखी गौप्यस्फोट होतील : राहुल गांधी 

अटक करण्यात आलेल्या आरोपींनी राजाभाऊ गोरे यांना अघोरीविद्या येत असल्याचे सांगून पैशांचा पाऊस पाडून देतो असे सांगितले. तसेच गुप्तधनातील सोने काढून देतो असे सांगून पुजा घालण्यास सांगितले होते. पथकातील अधिकाऱ्यांनी अटक करण्यात आलेल्या आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पथकाने आरोपींना पोलीसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. याप्रकरणी राजाभाऊ मोरे यांनी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादेवरुन पोलिसांनी महाराष्ट्र जादूटोणा कलमानुासार गुन्हा दाखल करुन अटक केली.

उद्या तळेगाव दाभाडेत शरद पवार यांच्या हस्ते शरद राव यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण

पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ हे करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांचे मार्गदर्शनाखाली दरोडा प्रतिबंधक पथकाचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक गजानन जाधव, पोलीस हवालदार अभिमन्यु औताडे, श्रीमंत उबाळे, संजय खताळ, पोलीस नाईक भारत बंड, राजेभाऊ नागरगोजे, राहुल शिंदे, माया साबळे, नारायण साबळे यांच्या पथकाने केली.

राहुल गांधींचे विमान क्रॅश होणार होते, चौकशी अहवालातून स्पष्ट

मुक्‍ता दाभोळकर, जितेंद्र आव्‍हाड होते निशाण्यावर; एटीएसचा धक्‍कादायक खुलासा 

Please Subscribe Us On You Tube