सावधान ! अ‍ॅसिडीटीची ‘ही’ गोळी खात असाल तर कॅन्सरचा धोका, ‘ड्रग कंट्रोलर’चा गंभीर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर ऍसिडिटीचा तुम्ही रेनिटिडाइन (Ranitidine) या औषधाचा वापर करत असाल तर तुम्ही हे वाचन गरजेचं आहे. ड्रग कंट्रोलर ऑफ इंडिया ने मंगळवारी ऐंटी – ऐसिडिटी औषध Ranitidine वर सार्वजनिक स्वास्थ सूचना टाकली आहे. ड्रग कंट्रोलर ने याबाबत म्हंटले आहे कि रेनिटिडाइन औषधात असे अनेक केमिकल आढळून आले आहेत ज्यामुळे कॅन्सर होऊ शकतो.

रेनिटिडाइन या औषधाचा वापर हा फक्त ऍसिडिटीसाठी होत नसून अनेक वेगवेगळ्या आजारांसाठीसुद्धा होतो. हे औषध मार्केटमध्ये अनेक वेगवेगळ्या स्वरूपातील गोळ्या आणि इंजेक्शनच्या माध्यमातून मिळते.

काढण्यात आली सूचना
एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार स्वास्थ्य सेवा महानिदेशालय ड्रग्स कंट्रोलर, वी जी सोमानी यांनी सर्व राज्यांमध्ये याबाबतचे निर्देश जारी केले आहेत आणि राज्यांना यावर पाऊल उचलण्याचे आदेश दिले आहेत.

या औषधाबाबत सगळ्यात आधी अमेरिकेच्या एफडीए ने सांगितले होते आणि याबाबत अलर्ट जारी केला होता.

भारतात सुरु असलेल्या या औषधाच्या निर्मिती कंपन्यांना निर्मिती थांबवण्याचे तत्काळ आदेश देण्यात आले होते.

ड्रग कंट्रोलर द्वारा सर्व डॉक्टरांना या सूचना देण्यात आल्या आहेत की त्यांनी रुग्णांना ही औषधे न घेण्याचे सांगणे.

आता पुढे काय –
भारतात औषधाची गुणवत्ता तपासणी करणाऱ्या  द सेंट्रल ड्रग्स स्टैंडर्ड कंट्रोल ऑर्गनाइजेशन ने रेनिटिडाइन शी निगडित या प्रकाराला एक्सपर्ट कंपनीकडे सोपवण्यात आले आहे. ही कंपनी देशभरात वेगवेगळ्या ठिकाणच्या या औषधाची तपासणी करणार आहे.

Visit : policenama.com