भारत-चीन तणावामुळं लवकरच महागार ‘या’ दैनंदिन जीवनातील गोष्टी, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत आणि चीनमधील तणाव वाढत आहे. भारत चिनी वस्तूंवर संपूर्णपणे बंदी आणत आहे. यामुळे बर्‍याच वस्तू महाग होऊ शकतात, आता या यादीमध्ये कपडे महागणार आहेत. यामागचे कारण असे आहे की, आता चीनमधून कपडे आणि ते बनवणाऱ्या मशीनशी संबंधित वस्तू भारतात येऊ शकत नाहीत. चीनमधून बटण, धातू आणि शिलाई मशीन भारतात येतात. भारतातील सर्वात मोठे कापड तयार करण्याचे केंद्र तिरुपुरम मध्ये आहे. जिथे ९० टक्के सामान चीनमधून येते. चीनकडून येणारे फास्टनर, बटण, शिलाई मशीन, निडल लेपल पिन आणि टेक्सटाइल मटेरियलवर भारत अवलंबून आहे.

एका वृत्तसंस्थेनुसार, चीनकडून येणारे बरेच टन सामान बंदरात अडकले आहे. जोपर्यंत आपण हा सर्व माल दुसर्‍या उद्योगातून आणण्याची व्यवस्था करू, तोपर्यंत उद्योग क्षेत्राला मोठे नुकसान झाले असेल. खरतर वस्त्रोद्योगाशी संबंधित हे सर्व सामान तुर्की, तैवान, व्हिएतनाम आणि थायलंडमधूनही मिळू शकते. मात्र हे देखील आहे की, बर्‍याच आवश्यक वस्तू आणि मशीनचे स्पेअर पार्टस केवळ चीनमध्ये उपलब्ध आहेत. परदेशी ब्रँडसाठी कपडे बनवणार्‍या निर्यातदारांचे म्हणणे आहे की, आवश्यक वस्तू नसल्यामुळे त्यांच्या निर्यात ऑर्डरला उशीर होत आहे.

गारमेंट सेक्टर छोट्या सुईपासून फॅब्रिक ग्लूपर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी चीनवर अवलंबून आहे. हे सामान भारतात देखील बनवले जाऊ शकते, पण त्यासाठी सरकारचे सहकार्य असणे आवश्यक आहे.