Coronavirus : 21 दिवसांच्या लॉकडाऊनमुळं भारताला होऊ शकतं 9 लाख कोटींचं नुकसान !

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   भारताने कोरोना व्हायरस विरुद्ध लढण्यासाठी २१ दिवसांसाठी लोकडाऊनची घोषणा केली आहे. पण बार्कलेज (Barclays) च्या अहवालाचे म्हणणे आहे की, याने देशाला १२,००० कोटी अमेरिकन डॉलरचे नुकसान होऊ शकते. याने देशाचा जीडीपी ४ टक्के होईल. तज्ञांचे म्हणणे आहे की, आता देशाच्या आर्थिक परिस्थितीला पुन्हा रुळावर आणण्यासाठी पॅकेजची घोषणा करण्याची आवश्यकता आहे.

बार्कलेजच्या अहवालानुसार, ३ आठवडे म्हणजे २१ दिवस लॉकडाऊनमुळे भारताला ९००० कोटी डॉलरचे नुकसान होईल. पण महाराष्ट्रासारखी अनके मोठी राज्ये आधीपासूनच बंद आहेत. त्यामुळे हे नुकसान आणखी वाढेल असे सांगितले जात आहे. या अहवालात म्हटले आहे की, सरकारने मदत पॅकेज दिले तर अशात आर्थिक घट वाढून ५ टक्क्यावर पोहोचू शकते.

लवकरच होऊ शकते मदत पॅकेजची घोषणा

भारतीय रिजर्व्ह बँकेची ३ एप्रिलला आढावा बैठक होणार असून त्यात व्याजदर कमी करण्याबाबत निर्णय होणार आहे. पीएम नरेंद्र मोदी यांनी देशात कोरोना व्हायरसच्या संक्रमण प्रसाराला रोखण्यासाठी तीन आठवडे लॉकडाऊनची घोषणा केली आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी मंगळवारी अनके मोठ्या घोषणा केल्या. त्यांनी आर्थिक वर्ष २०१८-१९ साठी इन्कम टॅक्स रिटर्नची डेडलाईन वाढवून ३० जून २०२० केली आहे.

यासोबतच ३० जूनपर्यंत विलंब देयाचे व्याजदर १२ टक्क्याने कमी करून ९ टक्के केले गेले. सोबतच टीडीएसच्या डिपॉजिटसाठी व्याजदर १८ टक्क्याने कमी करून ९ टक्के केले गेले. टीडीएस भरण्याची शेवटची तारीख ३० जून २०२० च राहणार असल्याची घोषणा अर्थ मंत्र्यांनी पत्रकार परिषदेत केली.

माहितीनुसार, पुढच्या ४८ तासात अर्थमंत्री आर्थिक पॅकेजची घोषणा करू शकतात. तथापि, हे किती मोठे असेल आणि याचे स्वरूप असेल याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.