तुमच्याकडेही आहेत फाटक्या, तुटक्या नोटा ? बदलून घेण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – खरतर आपल्याकडे बऱ्याचदा फाटक्या – तुटक्या, जुन्या, रंग गेलेल्या नोटा असतात. अशा नोटा कोणी घ्यायला सहजासजी धजत नाही. मग अशावेळेला या जुण्या नोटांचे करायचे काय ? असा प्रश्न पडतो. काही वेळेला दोन तुकडे झालेल्या नोटा देखील असतात. विशेषतः पावसाळ्याच्या दिवसात नोटा भिजल्या की मात्र पैसे बदलून घेण्याची पंचाईत होते. अशा वेळेला करायचं काय याबाबत माहिती करून घेऊया.

रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार अशा नोटांना बदलता येते. नोटांची अवस्था पाहून या नोटेसाठी किती रुपये द्यायचे हे ठरवण्यात येते. नोटा पाहून नोटेसाठी पूर्ण किंवा अर्धे पैसे या फाटक्या तुटक्या नोटांच्या बदल्यात मिळतात. भारतात १०,५०,१००,५०० च्या नोटा चलनात आहेत. याशिवाय नोटबंदीनंतर २००, ५०० आणि २००० रुपयांच्या नोटा चलनात आल्या आहेत.

प्रत्येक नोटेसाठी वेगळा नियम

फाटलेल्या नोटेकरीता किती रक्कम मिळणार हे त्या नोटेची किंमत आणि त्याचा किती हिस्सा शिल्लक आहे यावरून ठरवले जाते. जसे की २०००च्या नोटेचा ८८sqcm भाग शिल्लक असेल तर अशा नोटेच्या बदल्यात पूर्ण पैसे मिळतात. तर ४४sqcm वर आर्धी रक्कम मिळते. २००० ची पूर्ण नोट १०९.५६sqcm ची आहे.

कोणत्या नोटांना बदलण्याची सुविधा ?

१) जी नोट भिजली आहे, अनेकजणांकडून वापरून जिर्ण झाली आहे.
२)जी नोट फाटलेली आहे आणि तिचे सर्व तुकडे आहेत.
३)ज्या नोटा मिस मॅच आहेत. म्हणजेच वेगवेगळे तुकडे जोडून चुकीची प्रिंट(उलट -सुलट) असलेली नोट बनवण्यात आली आहे.
४)खूपच वाईट अवस्थेत असलेल्या नोटा ज्यांचा नंबर देखील दिसत नाही अशा नोटा बदलता येत नाहीत.

नोटांवर लिहू नकाच

अनेकांना नोटांवर लिहण्याची सवय असते. मात्र RBI च्या नियमानुसार नोटांवर काही लिहले तर ते मान्य आहे. पण त्यावर लिहलेला संदेश जर राजकीय स्वरूपाचा असेल तर तो लीगल टेंडर मनाला जात नाही.

कशा बदलाल जुन्या नोटा

कोणत्याही बँकेच्या शाखेत जाऊन नोटा बदलता येतात. याकरिता तुम्ही RBI Office मध्ये देखील जाऊ शकता. कोणत्याही बँकेत जुन्या, जिर्ण नोटा कोणत्याही बँकेच्या शाखेत बदलता येतात मात्र अट एकच आहे की या नोटा खोट्या नसाव्यात. यासाठी कोणताही शुल्क आकारण्यात येत नाही. तसेच यासाठी संबंधित बँकेचा खातेदार असणे देखील आवश्यक नाही. मात्र ही बाब लक्षात ठेवा की तुम्हाला २० किंवा त्याहीपेक्षा जास्त नोटा बदलायला हव्यात. याशिवाय काही दुकानांमध्ये फाटक्या तुटक्या नोटा बदलता येतात. पण दुकानदार याकरिता कमिशन घेतात.

या नोटा बदलता येत नाहीत

१)RBI च्या नियमांनुसार वाईटप्रकारे जळालेल्या, खूप तुकडे तुकडे झालेल्या नोटा बदलता येत नाहीत.
२)ज्या नोटांवर राजकीय संदेश किंवा घोषणा लिहलेल्या असतात अशा नोटा स्वीकारल्या जात नाहीत.
३) जर बँक आधिकाऱ्याला वाटले की तुम्ही जाणून बूजून नोट फाडली किंवा कापली असेल तर नोटा बदलण्यासाठी बँक अधिकारी नकार देऊ शकतात.