गुजरातमध्ये पुढच्या वर्षी बनणार हवेत ‘उड्डाण’ घेणारी कार, नेदरलॅन्डच्या ‘या’ कंपनीशी झालं ‘अ‍ॅग्रीमेंट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात हवेत उड्डाण करणाऱ्या कारचे स्वप्न लवकरच पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. नेदरलँड्स (डच) ची कंपनी पीएएल-व्ही (पर्सनल एअर लँड व्हेईकल) पुढील वर्षापर्यंत भारतात हवेत उडणारी कार बनवण्यास सुरू करणार आहे. यासाठी कंपनी मॅनुफॅक्चरिंग प्रकल्प उभारण्याची तयारी करत आहे. एका वृत्तानुसार, पीएएल-व्हीचे व्हाईस प्रेसिडेंट कार्लो मॅस्बॉमाईल आणि राज्याचे प्रधान सचिव एमके दास यांच्यात एक सामंजस्य करारही झाला आहे. कंपनीच्या अधिकृत निवेदनानुसार राज्य सरकार पीएएल-व्हीला प्रकल्प उभारणीसाठी सर्व प्रकारच्या मंजुरी मिळविण्यात मदत करीत आहे.

image.png

पीएएल-व्हीचे इंटरनॅशनल बिजनेस व्हाईस प्रेसिडेंट कार्लो मॅस्बॉमाईल म्हणाले की चालत्या कार चे अवघ्या ३ मिनिटात उडत्या कारमध्ये रूपांतर होईल, जेव्हा ती उतरेल तेव्हा तिचे एक इंजिन काम करणे चालू ठेवेल आणि वेग मर्यादा १६० किमी प्रतितास असेल. पीएएल-व्हीने सांगितल्याप्रमाणे, जेव्हा ही कार हवेत उड्डाण करेल तेव्हा कारमध्ये दोन इंजिन कार्यरत असल्याने स्पीड १८० किमी प्रति तास असेल. एकदा टॅंक पूर्ण केली तर ही कार ५०० किमी चा पल्ला गाठू शकेल. छोट्या विमानात वापरण्यात येणारे रोटेक्स इंजिन या कारमध्ये बसविण्यात येणार आहे. कंपनीला आतापासूनच ११० फ्लाइंग कारचे ऑर्डर मिळाल्या आहेत, ज्यांना भारतात एक्सपोर्ट केले जाईल.

फ्लोरिडा मध्ये लाँच झाली उडती कार
जगातील पहिली चालणारी आणि उडणारी कार फ्लोरिडामध्ये लाँच झाली आहे. या कारचे नाव पीएएल-व्ही ठेवण्यात आले आहे. या कारच्या वरच्या भागात रियर प्रोपेलर्स बसविण्यात आले आहेत ज्यांची आवश्यकता नसल्यास ते काढले देखील जाऊ शकतात. त्यांच्या मदतीने ही कार १२,२०० फूट उंचीवर उडू शकते.

किती लोक प्रवास करणार ?
हवेत उड्डाण करणार्‍या या कारमध्ये दोन लोक बसू शकतात आणि या कारमध्ये २३० हॉर्सपावरचे चार सिलेंडर इंजिन बसवण्यात आले आहेत. ही कार तीन सीटच्या कारमधून दोन सीट असणाऱ्या गायरोकॉप्टर मध्ये अवघ्या १० मिनिटांत बदलते. ही कार आठ सेकंदाच्या आतच शून्यापासून ६० मैल प्रति तास वेग पकडू शकते.