सर्वाधिक कमाई करणाऱ्यांच्या ‘फोर्ब्स’च्या यादीत बॉलिवूडचा ‘खिलाडी’ टॉप 5 मध्ये तर ड्वेन जॉनसन टॉपवर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – द रॉक नावाने प्रसिद्ध असलेला आणि अ‍ॅक्टर बनललेला रेसरल ड्वेन जॉनसन जगातील सर्वाधिक कमाई करणारा अ‍ॅक्टर ठरला आहे. फोर्ब्स 2019 नुसार, मागील वर्षी दुसऱ्या क्रमांकावर असलेला ड्वेन यावर्षी जॉर्ज क्लूनीला कमाईच्या बाबतीत मागे टाकत पहिल्या क्रमांकावर आला आहे. तर बॉलिवूड अ‍ॅक्टर अक्षय कुमारचं नाव या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.

नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या फोर्ब्स मॅगेझिनच्या यादीत ड्वेन हाइयेस्ट पेड अ‍ॅक्टरच्या लिस्टमध्ये टॉपला आहे. जुमांजी आणि फास्ट अँड फ्युरियस यांसारख्या अ‍ॅक्शन मसाला सिनेमात काम केल्यानंतर ड्वेन प्रेक्षकांमध्ये खूपच फेमस झाला. रिपोर्ट्सनुसार, जून 2018 पासून यावर्षी जूनची आकडेवारी पाहता ड्वेन मागील एका वर्षात 89.4 मिलियन डॉलर (6,39,54,97,200 रुपए) कमावले आहेत.

यात त्याचं वेतन आणि सिनेमातून मिळालेल्या नफ्याचा समावेश आहे. यात HBO वर येणारे एपिसोड बॅलर्स मधून 700,000 डॉलर (5,00,76,600 रुपए) प्रति एपिसोड आणि अंडर आर्मर सोबत त्याचे कपडे, शूज आणि हेडफोनची रॉयल्टीमध्ये सात आकड्यांचा समावेश आहे.

या यादीच्या टॉप 10 मध्ये अ‍ॅव्हेंजर्स एंडगेममधील दोन अ‍ॅक्टर्स क्रिस हेमस्वर्थ आणि रॉबर्ट डाऊनी जूनियर यांचा समावेश आहे. फोर्ब्स नुसार, क्रिस हेमस्वर्थची कमाई 76.4 मिलियन डॉलर आणि रॉबर्टची 66 मिलियन डॉलर आहे. या लिस्टमध्ये ब्रैडली कपूर, क्रिस इवांस आणि पॉल रूड देखील टॉप 10 मध्ये आहे.

अक्षय कुमारने केलं रेकॉर्ड
फोर्बसच्या हाइयेस्ट पेड अ‍ॅक्टर्सच्या लिस्टमध्ये बॉलिवूड अ‍ॅक्टर अक्षय कुमार चौथ्या क्रमांकावर आहे. त्याची टोटल कमाई 65 मिलियन डॉलर (4,64,99,70,000 रुपए) आहे. याशिवाय अ‍ॅक्टर जॅकी चॅनही 58 मिलियन कमावत टॉप 10 च्या यादीत समाविष्ट आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like