Early Death Sign | शरीरात दिसली ही लक्षणे तर होऊ शकतो अकाली मृत्यू, स्टडीमध्ये झाला खुलासा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Early Death Sign | मृत्यू (Death) हे जीवनाचे एक कटू सत्य आहे, ज्याचा कोणीही अंदाज लावू शकत नाही किंवा त्यापासून वाचू शकत नाही. मात्र, आता शास्त्रज्ञांनी असे लक्षण (Early Death Sign) शोधून काढले आहे, ज्यावरून असे दिसून येते की तुमच्यामध्ये अकाली मृत्यू होण्याची शक्यता आहे किंवा नाही.

 

सुमारे 2900 लोकांवर केले संशोधन
जर्नल ऑफ ग्रोन्टोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधन अहवालानुसार, 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या 2,906 लोकांची तपासणी करण्यात आली. अभ्यासात सहभागी झालेल्या स्वयंसेवकांना विचारण्यात आले की त्यांनी झाडे लावली, अर्धा तास चालले किंवा घरातील कामे केली तर त्यांना किती थकवा येतो.

 

जास्त थकव्यामुळे अकाली मृत्यूचा धोका
या संशोधनाच्या आधारे, शास्त्रज्ञांनी शोधून काढले की जे स्वयंसेवक इतरांपेक्षा जास्त थकल्यासारखे वाटतात त्यांना अकाली मृत्यूचा सर्वाधिक धोका होता. म्हणजेच, ते सरासरी वयाच्या (Early Death Sign) आधी मरू शकतात. अशा लोकांच्या मृत्यूचे तात्काळ कारण हार्ट अटॅक, ब्रेन स्ट्रोक किंवा ब्रेन हॅमरेज असू शकते. (Early Death Sign)

गंभीर आजारी लोकांना मृत्यूचा धोका जास्त
संशोधनात सहभागी शास्त्रज्ञांच्या मते, जे लोक जास्त थकलेले आहेत आणि ज्यांना आधीच असाध्य आजार किंवा तणाव आहे, त्यांना अकाली मृत्यू होण्याचा धोका सर्वाधिक असतो.

 

अशा लोकांनी त्यांच्या आरोग्याबाबत अधिक सतर्क राहणे आणि डॉक्टरांच्या संपर्कात राहणे आवश्यक आहे. डॉक्टर म्हणतात, अशा लोकांनी इम्युनिटी मजबूत करणे आवश्यक आहे. काही टिप्सद्वारे ते असे करू शकतात.

 

अकाली मृत्यू टाळण्यासाठी या आहेत टिप्स

1. दररोज सुमारे 15 मिनिटे चाला
2. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, फिट (Body Fitness) राहण्यासाठी दररोज 15 मिनिटे ते अर्धा तास चालावे.
3. शक्य असल्यास दररोज सकाळी किंवा संध्याकाळी अर्धा तास योगासने करा.
4. शरीराला पोषक आहार द्या.
5. जेवढे सहज करता येईल तेवढे काम करा.
6. शरीराला पूर्ण विश्रांती द्या.
7. कुटुंबासोबत वेळ घालवा
8. नवीन ठिकाणी भेट द्या.

या सर्व उपायांनी शरीर आणि मन दोघांनाही ऊर्जा मिळते आणि शरीराची इम्युनिटी वाढते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Early Death Sign | early death sign tiredness and fatigue are symptoms of early death

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Premature Aging | वेळेपूर्वी दिसू लागल्या असतील चेहर्‍यावर सुरकुत्या, तर जाणून घ्या ‘ही’ 10 मोठी कारणे

Bath Tips | 15 मिनिटापेक्षा जास्त आंघोळ करणे आरोग्यासाठी नुकसानकारक, या 5 चूका करणे टाळा

Vitamin D deficiency | ‘या’ लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष, असू शकते ‘व्हिटॅमिन डी’ची कमतरता