‘या’ मोठया, नामांकित कंपनीची ‘भन्‍नाट’ ऑफर, फावल्या वेळेत काम करा आणि मिळवा ‘भरघोस’ रक्‍कम

बंगळुरु : वृत्तसंस्था – तुम्ही एक वर्किंग पर्सन आहात ? तुमचं काम सांभाळूनही तुमच्याकडे रिकामा वेळ असतो ? तुम्हाला पार्टटाईम काम करायचं आहे ? तुमच्यासाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. तुम्ही आता अमॅझॉन या नामांकित कंपनीसाठी काम करू शकता. या कंपनीसाठी पार्ट टाईम काम करण्याची तुम्हाला संधी आहे. तुम्हाला अमॅझॉनचे सामान त्यांच्या ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करायचे आहे. यासाठी कंपनी प्रतितास १२० रुपये ते १४० रुपये तुम्हाला कामाचा मोबदला देते.

काय आहे ‘अमॅझॉन फ्लेस’ सर्व्हिस ?

अमॅझॉन ही ई कॉमर्स क्षेत्रातील नामांकित आणि दिग्गज कंपनी आहे. या कंपनीने गुरुवारी अमॅझॉन फ्लेक्स सर्व्हिस सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पार्टटाईम काम करू इच्छिणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. जर तुम्ही कॉलेज स्टुडंट असाल तरीही हे काम करू शकता. या योजनेअंतर्गत तुम्ही फूड डिलिव्हर एक्झिक्युटीव्ह, सर्व्हिस सेक्ट स्टाफ कंपनीसाठी सामान डिलिव्हर करण्याचं काम करू शकता. अमॅझॉनने याआधी इतर देशात ही योजना सुरु केली आहे. आता भारतातही या योजनेची सुरुवात केली जात आहे. या योजनेची सुरुवात झालेला भारत हा जगातील ७ वा देश आहे. या योजनेमुळे अमॅझॉनच्या डिलिव्हरी नेटवर्कमध्ये सुधारणा होण्यास मदत होणार आहे. प्रतितास दिल्या जाणाऱ्या या मानधनात इंधनासाठी लागणारा खर्चही समाविष्ट करण्यात आला आहे.

कोणत्या शहरात झाली आहे ‘अमॅझॉन फ्लेस’ची सुरुवात ?

अमॅझॉनने सर्वात आधी दिल्ली, मुंबई आणि बंगळुरू या शहरात अमॅझॉन फ्लेक्सची सुरुवात केली आहे. ही योजना देशातील ७ शहरात राबवली जाणार आहे. आजपर्यंत ही सुविधा स्पेन, जपान, सिंगापूर, जर्मनी, ब्रिटेन याठिकाणी सुरु केली आहे. अमॅझॉनने ही सुविधा २०१५ मध्ये अमेरिकेत सुरु केली होती.

कशी आहे प्रक्रिया ?

जर तुम्हाला पार्ट टाईम काम करायचे असेल तर, तुम्हाला अमॅझॉन फ्लेक्स अॅप डाऊनलोड करावे लागेल. तु्म्ही या अॅपमध्ये जाऊन पार्ट टाईम काम करण्यासाठी अर्ज करू शकता. त्यानंतर अमॅझॉनकडून तुमच्या अर्जाची पडताळणी केली जाते. त्यानंतर तुम्ही तुमच्या बाईकवरून डिलिव्हरीच्या कामाला सुरुवात करू शकता. जे सामान तुम्हाला बाईकवरून नेण्यास दिले जाणार आहे बाईकवरून नेणं सोपं असणार आहे. तुम्ही ते सहज कॅरी करू शकता असं असणार आहे. तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास अमॅझॉनने त्यांच्या अॅपवर याबबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. तुम्ही तो पाहून पूर्ण माहिती घेऊ शकता.

सिनेजगत

सलमान खानच्या ‘या’ अभिनेत्रीचा ‘प्रेमभंग’, बॉयफ्रेंडने केलं ‘ब्रेकअप’

पूनम पांडे म्हणते, माझे फोटो-व्हिडीओ म्हणजे ‘समाजसेवा’

ब्रेकअपनंतर अशी झाली होती शाहिद कपूरची ‘हालत’

सिंहाच्या तोंडावर ‘केक’ लावल्यामुळे भडकली रविना टंडन