महिला बलात्काराचा आरोप ‘विद्रूप’ चेहर्‍याच्या पुरूषांवर करतात, ‘या’ देशाच्या राष्ट्रपतींचा दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एका देशाचे राष्ट्रपती जर असे म्हणत असतील की महिला लैगिक अत्याचाराची (Sexual Harassment) तक्रार तेव्हा करतात जेव्हा बलात्कार करणारा पुरुष हा कुरूप दिसणारा किंवा घाणेरडा असतो. तेव्हा लोक त्याच्याबद्दल काय विचार करतील? अशा वक्तव्यामुळे या राष्ट्रपतींना पूर्ण जगभरातील लोक कोसत आहेत. या राष्ट्रपतींना सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात ट्रोल केले जात आहे. चला तर जाणून घेऊया की कोण आहेत हे राष्ट्रपती आणि त्यांनी कोणतं विवादित विधान केले आहे.

हे आहेत इक्वाडोरचे (Ecuador) राष्ट्रपती लेनिन मोरेनो (President Lenin Moreno). इक्वाडोरच्या ग्वायाकिल सिटी येथे आयोजित इकॉनॉमिक्स कॉन्फरन्स दरम्यान ते म्हणाले की, लैंगिक शोषणाचे आरोप वाईट दिसणार्‍या पुरुषांसाठी अधिक धोकादायक असतो तर सुंदर दिसणाऱ्या पुरुषांसाठी हा धोका फार कमी असतो.

इक्वाडोरच्या एका वृत्तपत्राने लिहिले आहे की, लेनिन मोरेनोने या गोष्टीवर जोर दिला आहे की ही एक चांगली बाब आहे की, महिला लैंगिक शोषणावर आवाज उठवत आहेत. परंतु काही वेळेस महिला कुरूप दिसणाऱ्या पुरुषांवर नाराज होतात आणि त्यानंतर त्या तक्रार करतात.

लेनिन मोरेनो यांनी सांगितले की, महिला लैंगिक शोषणाचा आरोप फक्त कुरूप आणि घाणेरड्या राहणाऱ्या पुरुषांवरच करतात परंतु सुंदर आणि स्मार्ट पुरुषांवर लैंगिक शोषणाचा आरोप लावत नाहीत. बर्‍याच वेळा अशा घटनांना मुद्दाम वरचढ करून सांगितलं जातं.

त्यांच्या विधानामुळे लेनिन मोरेनो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहेत. दरम्यान लेनिन मोरेनो यांनी ट्वीट करून सांगितलं की, लैंगिक अत्याचाराबाबत मी केलेल्या वक्तव्याचा लोक चुकीचा अर्थ काढत आहेत. मी या विषयाचे गांभीर्य ओळखून आहे आणि यास कमी देखील लेखत नाही. परंतु जर कुणी माझ्या या वक्तव्यामुळे दुखावले गेले असेल तर मी सर्वांची माफी मागतो.