Homeशहरपुणेसर्वांच्याच फाईल्स 'ED'कडं, 'मोदी-शहा' सर्वांनाच 'ब्लॅकमेल' करतात (व्हिडिओ)

सर्वांच्याच फाईल्स ‘ED’कडं, ‘मोदी-शहा’ सर्वांनाच ‘ब्लॅकमेल’ करतात (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीच्या निकालाला दहा दिवस झाले असतानाही अद्याप राज्यामध्ये सरकार स्थापन झाले नाही. शिवसेना मुख्यमंत्री पदावर आडून बसली आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसने सेनेला पाठिंबा दिला तर शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकतो अशी स्थिती सध्या राज्यात आहे. त्यातच आता माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेने इतर पक्षांसोबत जावे असा सल्ला दिला आहे.

बी.जी. कोळसे पाटील यांनी फेसबुकवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, ज्यावेळी नवीन सरकार येते त्यावेळी जुन्या बाटलीत नवीन पाणी असे म्हटले जाते. मात्र भाजपचे सरकार येते त्यावेळी जुन्या बाटलीत पाणी नसते तर त्यामध्ये विष असते. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी इतर पक्षांना जनतेने आदेश दिला आहे. शिवसेनेला पाठिंबा देऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री करा पण भाजपला पुन्हा सत्तेत आणू नका असे आवाहन त्यांनी इतर पक्षांना केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर निशाणा साधताना कोळसे पाटील म्हणाले, सध्या सर्वांच्याच फाईली ईडीकडे आहेत. मोदी-शहा सर्वांनाच ब्लॅकमेल करतात. ईडीला घाबरु नका शरद पवार यांनी राज्याला दाखवून दिलेय, घाबरायचे नाही.

देवेंद्र फडणवीस ‘झुरळ’
जनसत्तेसमोर हिटलर देखील नतमस्तक झाला होता. जनसत्तेसमोर देवेंद्र फडणवीस हे झुरळ आहेत. ज्याप्रमाणे हिटलर नतमस्तक झाला त्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा देखील नमतील. सध्या राज्याला भाजप विरहीत सरकारची गरज आहे. त्यामुळे नवनिर्वाचीत आमदारांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत.

आता नाही तर पुन्हा कधीच नाही
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील पाच वर्षात उद्धव ठाकरे यांचा खूप अपमान केला आहे. शिवसेनेची अवहेलना केली आहे. एवढी अवहेलना आत्तापर्यंत कधीच झाली नव्हती. आता शिवसेनेची वेळ आली आहे. शिवसेना युद्धात जिंकली मात्र त्यांनी तहामध्ये हारता कामा नये. त्यांनी इतर पक्षांच्या साथीने सरकार स्थापन करावे. हीच ती वेळ असून जर शिवसेनेने आता योग्य निर्णय घेतला नाही तर त्यांना भविष्यात अशी संधी पुन्हा मिळणार नाही, असे कोळसे पाटील म्हणाले.

Visit : Policenama.com 

शिंक कधीच दाबून ठेऊ नका, शरीरावर होऊ शकतात ‘हे’ गंभीर परिणाम
अभिनेत्री मलाइका अरोडा म्हणते, ‘खास डाएटपेक्षा नेहमी पौष्टिक आहार घ्यावा’
प्रेशर कुकर वापरताना ‘हे’ १० नियम आवश्य पाळा…आणि सुरक्षित रहा
मानसिक, शारिरीक आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर ‘हे’ जरूर वाचा
उर्जा आणि उत्साह दिवसभर टिकवण्यासाठी ‘हे’ आवश्य करा, जाणून घ्या
संक्रमणापासून बचावासाठी करा; या विटॅमिनचा वापर, जाणून घ्या –
चांगल्या आरोग्यासाठी शरीराला दररोज किती कॅलरीजची असते आवश्यकता –
वजन कमी करण्याचा ‘हा’ आहे खास ‘जपानी फार्मुला’! जाणून घ्या

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News