जेट एअरवेजच्या माजी CEO च्या मुंबईतील घरावर ED चा छापा

पोलीसनामा ऑनलाइन : जेट एरवेज चे माजी सीईओ नरेश गोयल यांच्या मुंबईतील घरावर अंमलबजावणी संचालनाने (ED) छापा मारला आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात हा छापा टाकण्यात आला असून या प्रकारणात अंमलबाजवणी संचालनाने नवीन गुन्हा दाखल केला आहे.

छापा टाकण्यापूर्वी ED ने फेमा अंतर्गत (FEMA) कार्यवाही करीत मुंबई व दिल्ली येथील १२ ठिकाणांचा तपास केला होता. यामध्ये जेट अधिकाऱ्यांच्या अनेक ठिकाणांचा समावेश आहे. तपासादरम्यान नरेश गोयल यांच्या १९ कंपन्यांची माहिती मिळाली असून ५ कंपन्यांची परदेशात नोंदणी करण्यात आली आहे.
ED ने छाप्यादरम्यान परदेशी कंपनीसोबत केलेली व्यवहाराची कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे ताब्यात घेतले आहे.

नरेश गोयल यांच्यावर अप्रत्यक्ष स्वरूपात परदेशातील अनेक कंपन्यांवर नियंत्रण असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ज्यामध्ये ‘टॅक्स हँवन’ देशांचा समावेश आहे. सुरुवातीला तपासात हि गोष्ट लक्षात आली की, नरेश गोयल यांनी टॅक्स वाचवण्यासाठी देशी आणि परदेशी कंपन्यांमध्ये अनेक संदिग्द्ध प्रकारे व्यवहार केले आहेत.