‘सूज’वर आयुर्वेदिक औषध : शरीराच्या आतील किंवा बाहेरील सूज कमी करण्यासाठी करा ‘हे’ 8 घरगुती उपाय

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –    शरीरात सूज असणे ही एक सामान्य समस्या आहे, यास वैद्यकीय भाषेत इडिमा (Edema) म्हटले जाते. नेहमी ही समस्या आपोआप बरी होते, परंतु अनेक बाबतीत ही समस्या गंभीर होऊ शकते. अनेकदा शरीराच्या आत किंवा बाहेर सूजेचे कारण इन्फेक्शन ऐवजी काही वेगळेच असू शकते, जे तुमच्यासाठी इतके धोकादायक ठरू शकते की, एखाद्या अवयवाचे नुकसान होऊ शकते.

सूजची लक्षणे

शरीराच्या ज्या भागात सूज असते, त्या भागात खाज सुटणे, त्वचा कोरडी होणे, कमजोरी, ताप, पोट फुगणे, त्वचा ताणली जाणे किंवा जखमेच्या भागात वेदना जाणवणे अशी लक्षणे जाणवतात.

सूज दूर करण्याचे उपाय

1 गाजराचे बी

एक ग्लास पाण्यात दोन चमचे गाजरचे बी उकळवा. नंतर ते थंड करून प्या. नियमित काही दिवस हा उपाय केल्यानंतर सूज वेगाने कमी होते.

2 लोणी

लोण्यात काळीमिरीचे चूर्ण टाकून चांगले मिसळा आणि सेवन करा. काही दिवसात सूज नष्ट होईल.

3 कच्चा बटाटा

400 ग्रॅम पाण्यात 200 ग्रॅम कच्चे बटाटे कापून उकळवा. याद्वारे सूजेवर शेक द्या. बटाट्याच्या तुकड्यांचा लेप करा.

4 टरबूजचे बी

टरबूजचे बी सावलीत सूकवा आणि ते वाटून घ्या. यानंतर एक कप पाण्यात तीन-चार चमचे टरबूतचे बी मिसळून एका तासासाठी भिजत ठेवा. दिवसात काहीवेळा याचे सेवन करा.

5 हळदीचे दूध

एक ग्लस गरम दूधात एक चमचा हळद पावडर आणि वाटलेली खडीसाखर टाकून रोज हे दूध प्या. दोन-तीन दिवसा सूज कमी होईल.

6 बार्लीचे पाणी

बार्लीमध्ये ते सर्व गुण आढळतात जे शरीरासाठी आवश्यक असतात. एक लीटर पाण्यात बार्ली उकळवून आणि थंड करून पित राहिल्यास सूज कमी होते.

7 कोथेंबिर

कोथेंबिरीची ताजी पाने आणि बी दोन्हीमध्ये सूज कमी करण्याचे गुण आढळतात. पायांवर सूज असल्यास एक कप पाणी उकळवून त्यामध्ये तीन चमचे आख्ये धने टाका. हे उकळून पाणी निम्मे होऊ द्या. आता ते गाळून घ्या आणि कोमट झाल्यावर त्यामध्ये एक चमचा मध टाकून दिवसात दोन वेळा प्या.

8 ऑलिव्ह ऑईल

थोड्या ऑलिव्ह ऑईलमध्ये लसण्याच्या दोन पाकळ्या कापून भाजा आणि यामधून लसूण काढून टाका. आता हे तेल पायावर लावून दोन-तीनवेळा मॉलिश करा.