… म्हणून शरद पवारांवर ED नं गुन्हा दाखल केला, मुख्यमंत्री फडणवीसांचा ‘गौप्यस्फोट’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता, यात अजित पवार यांच्याबरोबर इतर मंत्र्यांचा देखील समावेश होता. यानंतर शरद पवार यांनी ईडीच्या कार्यालयात जाण्याचा ठरवले. या नाट्यमय घडामोडी विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर घडल्या. परंतू मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना त्यावर भाष्य करत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

एक मराठी वृत्तवाहिनीला देण्यात आलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की बँकांमध्ये विविध प्रकारचे ठराव केले जायचे. काही कर्ज शरद पवारांच्या निर्देशानुसार देण्यात आले, काही ठरावात अशा नोंदीही आढळून आल्या आहेत. तर काही वेळा शरद पवारांनी पत्र पाठवले आहेत त्यामध्ये पवारांनी संबंधित व्यक्तीला कर्ज द्या असे आहे. या सर्व आधारे त्यांचे नाव ईडीच्या गुन्ह्यात दाखल करण्यात आले आहे.

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या आरोपावर शरद पवार यांनी देखील प्रतिउत्तर देत आरोप फेटाळले आहेत, मी कधीही कोणत्याही संस्थेला पत्र दिले नाही. जर मी पत्र दिले असेल तर त्याची चौकशी व्हावी.

ईडीचा गुन्हा दाखल झाल्यावर देखील शरद पवारांनी याबाबत पत्रकार परिषद घेत भाष्य केेले होते की, ज्या शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला त्या बँकेत मी संचालक पदी नव्हतो, सभासद नव्हतो असे असताना माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मी चौकशीत पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहे. आचारसंहिता लागल्यानंतर मी राज्यभर निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असणार आहे. त्यामुळे मी चौकशीपासून पळ काढतोय असे अर्थ निघू नये यासाठी ईडी कार्यालयात जाण्याचा मी निर्णय घेतला होता. मात्र निवडणूकीचे वातवरण असताना मुख्यमंत्र्यांनी हा मुद्दा पुन्हा एकदा उखरुन काढला आहे. आता यावर राष्ट्रवादी काय प्रतिउत्तर देणार हे महत्वाचे ठरेल.

शरद पवार म्हणाले की, –
शरद पवार नाबार्डच्या मार्गदर्शक तत्वांवर बोलताना म्हणाले की, राज्यात अडचणीत असलेल्या जिल्हा बँकांना मदतीसाठी नाबार्डने काही मार्गदर्शक तत्व आखली आहेत, त्या बँकांना पुनरुज्जीवन करण्याची जबाबादारी ही नाबार्डची असते. राज्य सहकाही बँकांना या मार्गदर्शक तत्वांच्या आधारे काही संस्थांना मदत करण्याचा निर्णय घेतला परंतू माझा त्याच्याशी काही एक संबंध नाही. त्या बँकेत मी संचालक देखील नव्हतो आणि सभासद देखील नव्हतो. असे असताना देखील माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी