Homeक्राईम स्टोरीलोणी काळभोरमध्ये संस्था चालकास 'जबर' मारहाण !

लोणी काळभोरमध्ये संस्था चालकास ‘जबर’ मारहाण !

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन (हनुमंत चिकणे) – शाळेसमोर दारू कशाला पिता याचा जाब विचारल्यामुळे शाळेच्या अध्यक्षाला व त्याच्या भावाला सात ते आठ जणांच्या टोळक्याने जबर मारहाण केली. याप्रकरणी शैलेश अर्जुन चंद (वय – २८ रा. फुरसुंगी, चंदवाडी ता. हवेली) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार लोणी काळभोर पोलिसात किरण माळवडकर व राजेश पवार (दोघेही रा. गुजरवस्ती, कदमवाकवस्ती ता. हवेली) व इतर पाच जणाविरूद्ध पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शैलेश चंद यांची गुजरवस्ती येथे गोल्डन सियारा या नावाची इंग्लिश मेडियम शाळा आहे. मंगळवारी संध्याकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास घरातूनच सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्यात पहिले असता शाळेसमोर सात ते आठजन दारू पित असल्याचे दिसले. त्यानुसार त्यांचे भाऊ रमेश चंद व चुलत भाऊ आनंद धनंजय चंद, व पंडित सुभाष चंद हे शाळेवर येऊन पाहणी केली असता सात ते आठजन तेथून पळून जाऊ लागले. त्यावेळी किरण माळवडकर याला पकडून जाब विचारला असता त्याचे मित्र राजेश पवार व आणखी पाच ते सहा जणांनी शैलेश चंद यांना काठीच्या सहाय्याने व लाथाबुक्यांच्या सहाय्याने मारहाण केली.

भाऊ रमेश याच्या मांडीवर उलट्या कोयत्याने मारहाण केल्यामुळे त्यांच्याविरुद्ध लोणी काळभोर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. लोणी काळभोर पोलिस तपास करीत आहेत.

Visit : policenama.com

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News