शिक्षणासाठी ‘पदवी’ लागते पण कलेला नाही, राज ठाकरेंनी सांगितलं स्वतःचं ‘गुपित’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आपल्याकडे कोणतीही पदवी नाही. तुझ्याकडे पदवी आहे का, असे आपल्याला विचारले नाही. शिक्षणाला पदवी लागते, उत्तम केलेला पदवी लागत नाही. आपल्याकडे कोणतीही पदवी नाही आणि तुझ्याकडे पदवी आहे का असे आपल्याला कोणी कधी विचारले नाही, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले.

झील इन्स्टिट्युट, कार्टुनिस्ट कंबाईन यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी ‘इंक अलाइव्ह’ या कार्यशाळेचे बालगंधर्व रंगमंदिरात आयोजन केले आहे. या कार्यक्रतात राज ठाकरे बोलत होते. या कार्यशाळेचे उद्घाटन ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांच्या हस्ते झाले. त्यांनी व्यंगचित्र काढून विद्यार्थ्यांना प्रात्याक्षिकाद्वारे माहिती दिली.

राज ठाकरे यांनी सांगितले की, मी जे जे स्कुल मध्ये शिकत होते. तिसऱ्या वर्षात असताना कॉलेज सोडले. माझ्याकडे कोणतीही पदवी नाही. माझे काका शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि वडिल श्रीकांत ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व्यंगचित्रकला शिकलो. आजवर कोणीही आपल्याला तुझ्याकडे पदवी आहे का, याची विचारणा केली नाही. त्याची मला गरजही भासली नाही.

तुम्ही सर्व जण भाग्यवान आहात. आजवर मी कधी फडणीससरांचे प्रात्याक्षिक पाहू शकलो नव्हतो. या वर्षातही त्यांच्या रेषा किती सरळ आहे, हात किती स्थिर आहे, हे तुम्ही पाहिले आहे. वयाबरोबर हात स्थिर राहणे खूप अवघड असते. तुमच्याकडे कोणतीही कला असेल तर शिक्षकांनी त्यांची कला ओळखून तिची जोपासना करण्याची आवश्यकता आहे.