हलगर्जीपणा भाेवला : पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षकाची तडकाफडकी बदली

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील दिघी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र काळे आणि उपनिरीक्षक सदाशिव शेडगे यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आलेली आहे. बदलीचे आदेश बुधवारी पोलीस आयुक्त आर.के. पद्मानाभन यांनी काढले आहेत.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’795884b8-cc7e-11e8-8f92-576008b0b844′]

आयुक्तालयाच्या झोन एकमध्ये दिघी पोलीस ठाणे आहे. आयुक्तालय होण्यापूर्वी पुणे पोलिसांच्या झोन चार मध्ये असणारे चिखली पोलीस ठाणे पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात वर्ग करण्यात आले आहे. या ठिकाणी काही दिवसांपूर्वी वरिष्ठ निरीक्षक खंडेराव खेरे यांची विशेष शाखेत बदली करून त्या ठिकाणी विवेक लावंड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र काळे, उपनिरीक्षक सदाशिव शेडगे हे दोघेही पोलीस ठाण्यात कार्यरत असताना कामात हलगर्जीपणा होत असल्याचे पोलीस आयुक्तांच्या निदर्शनास आले.
[amazon_link asins=’B07CRCPM4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7e69f9cb-cc7e-11e8-a8a3-e95c3fe4cf36′]

याबाबत पोलीस आयुक्ताशी विचारले असता कामात हलगर्जीपणा आणि ‘अन्य काही तक्रारी’ आल्या होत्या, त्या तपासून कारवाई केली असल्याचे सांगण्यात आले.

दिवाळीत घातपाताचा प्रयत्न, काश्मीरी विद्यार्थ्यांकडून एके-४७ जप्त

जालंधर : जालंधरच्या शाहपूरमध्ये इंजिनिअरिंग काॅलेजमध्ये शिकत असलेल्या तीन विद्यार्थ्यांना एके-४७ सोबत ताब्यात घेण्यात आले आहे. हे तीनही विद्यार्थी काश्मीरचे रहिवासी आहेत. ही कारवाई जम्मू पोलीस आणि सीआयएफच्या अधिकाऱ्यांनी केली. विद्यार्थ्यांच्या अटकेनंतर कॉलेजमध्ये भीतीचे वातावरण आहे.
[amazon_link asins=’B0796QP4LS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’29f40c30-cc80-11e8-9e26-add45dbf0c90′]
दहशतवादाने काश्मीरमधील युवकांना पोखरले असल्याचे समजते आहे. एेन दिवाळीमध्ये हे विद्यार्थी पंजाबमध्ये मोठा हल्ला करण्याच्या तयारीत होते. हे विद्यार्थी काश्मीरी दहशतवादी संघटना अंसार गजवत-उल-हिंद या संघटनेसाठी काम करत असल्याची माहिती समोर आली आहे.

पंजाब पोलिसांनी केलेल्या खुलाशानंतर राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांकडून एके-४७ सह इटालियन बनावटीची पिस्तुलं आणि २ मॅगझिन जप्त करण्यात आली आहेत. ही शस्रे या विद्यार्थ्यांच्या वसतीगृहातून ताब्यात घेण्यात आली आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like