लंडनमध्ये पाकिस्तानी मंत्र्याला बेदम मारहाण, भारताला दिली होती आण्विक हल्ल्याची धमकी

लंडन : वृत्तसंस्था – काश्मीरचे ३७० कलम रद्द केल्यानंतर भारताला आण्विक हल्ल्याची धमकी देणारे पाकिस्तानचे रेल्वे मंत्री शेख रशीद यांच्यावर अंडे फेकण्यात आले. इतकेच नाही तर त्यांना काही जणांनी मारहाणही केली. मात्र, याचा भारताशी काही संबंध नाही. पाकिस्तानमधील राजकारणातून त्यांना ही मारहाण झाली आहे.

पाकिस्तानच्या मिडियाने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानचे रेल्वे मंत्री शेख रशीद लंडनमधील एका पुरस्कार समारोहानंतर हॉटेलमधून बाहेर पडले. यावेळी त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. त्यांच्यावर अंडे फेकल्यानंतर काही जणांनी त्यांना मारहाण करुन ते पळून गेले.

पाकिस्तान पिपल्स पार्टीचे प्रमुख बिलावल भुट्टो यांच्याविषयी अपशब्द बोलल्याने हल्लेखोर रशीद यांच्यावर नाराज होते. पाकिस्तान पिपल्स पार्टीच्या यूथ ऑर्गनाइजेशनने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. पीपीपी यूथ ऑर्गनाइजेशन युरोपचे अध्यक्ष आसिफ अली खान आणि पार्टीच्या महिला शाखा अध्यक्ष समाह नाज यांनी एक पत्रक काढून रशीद यांनी पीपीपी प्रमुख बिलावल भुट्टो यांच्याविरुद्ध अपशब्द वापरल्याने त्यांच्याविरुद्ध हे पाऊल उचलावे लागले, असे त्यात म्हटले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like