Eggs Protein Nutritionist | कोणत्या प्रकारचे अंडे फायदेशीर? ‘हे’ खाताना बहुतांश लोक करतात ‘ही’ चूक, जाणून घ्या कोणती

नवी दिल्ली : Eggs Protein Nutritionist | अंडे हे प्रोटीनचा खजीना आहे. जगभरातील लोक नाश्त्यात अंडे खातात. मात्र लोक आपल्या इच्छेनुसार वेगवेगळ्या पद्धतीने अंडे शिजवतात. जसे की काहीजण उकडलेली अंडी खातात, तर काही लोक अंडा बुर्जी बनवून खातात. तर काही लोकांना ब्रेडसोबत ऑम्लेट खायला आवडते. तुम्ही अंडे (Eggs Protein Nutritionist) कसे खाता हे महत्वाचे नाही पण काहीही करून आपल्या आहारात त्याचा समावेश करा.

नमामी अग्रवाल यांनी सांगितले कसे खावे अंडे (How to eat egg)…

न्यूट्रीशनिस्टचे म्हणणे आहे की, अंडे कसे तयार करता यावर अंड्याचा आरोग्याला होणारा फायदा ठरतो. अंड्यातील प्रोटीन तुमच्या शरीरात किती जाते हे तुमची रेसिपी सांगते. डायटीशियन आणि न्यूट्रिशनिस्ट नमामी अग्रवाल (Dietitian and nutritionist Namami Agarwal) यांनी आपल्या इंस्टाग्राम पोस्टद्वारे अंडे कशाप्रकारे खाल्ल्याने जास्त लाभदायक आहे हे सांगितले आहे. (Eggs Protein Nutritionist)

पांढरा आणि पिवळा दोन्ही भाग महत्वाचे

नमामी यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, फनी फॅक्ट ही आहे की अंड्यात बहुतांश पोषकतत्व त्याच्या पिवळ्या भागात असतात. संपूर्ण अंडे म्हणजे पांढरा भाग आणि पिवळा भाग दोन्ही एकाचवेळी खाल्ल्याने प्रोटीन, फॅट, कॅलरीचे योग्य संतुलन शरीराला मिळते. या कॉम्बिनेशनमध्ये अंडे खाल्ल्याने बहुतांश लोकांचे पोट जास्त वेळ भरलेले राहते. (Eggs Protein Nutritionist)

कोण-कोणते व्हिटॅमिन असतात…

हेल्थ एक्सपर्टचे म्हणणे आहे की, अंडे सर्वप्रकारच्या पोषकतत्त्वांनी युक्त असते, मॉडर्न डाएटमध्ये याची कमतरता जाणवते. एका पूर्ण अंड्यात व्हिटॅमिन A – 6 टक्के, व्हिटॅमिन B5 – 7 टक्के, व्हिटॅमिन B12 – 9 टक्के, फॉस्फरस – 9 टक्के, व्हिटॅमिन B2 – 15 टक्के आणि सेलेनियम  22 टक्के असते. यासाठी आता अंडे बनवताना त्याचे दोन्ही भाग आठवणीने खा.

हे देखील वाचा

Pune Fire | पुण्यातील पिसोळी परिसरातील फर्निचर गोदामाला भीषण आग; तब्बल तीन तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर ‘नियंत्रण’

Pune Crime | 16 वर्षाच्या मुलीशी 19 वर्षीय तरुणाचं ‘झेंगाट’; आई बनल्यावर युवक आला ‘गोत्यात’

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Eggs Protein Nutritionist | eggs protein nutritionist shares an ideal way of eating them

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update