IPL 2021 ची मोठी बातमी ! KKR च्या ‘धुरंदर’ फलंदाजानंतर आता आणखीन 8 जणांना ‘कोरोना’ची लागण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगातील सर्वाधिक लोकप्रिय टी-20 स्पर्धा इंडियन प्रीमियर लीगला कोरोना व्हायरसचा धोका आहे. या लीगला आजून सुरवात झाली नाही आणि त्याआधीच मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरून धक्कादायक बातम्या समोर येत आहेत. कोलकत्ता नाईट रायडर्सचे फलंदाज नितीश राणानंतर वानखेडे स्टेडियमवर ८ जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. IPL च्या १४ व्या सत्रातील दहा सामने वानखेडे स्टेडियमवर आयोजित केले जात आहेत. हे सर्व सामने १० ते २५ एप्रिल दरम्यान खेळले जाणार आहेत. ९ एप्रिलपासून IPL सुरू होत आहे आणि कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रकरणांमुळे BCCI ची चिंता वाढणार आहे.

क्रीडा विभागाच्या अहवालानुसार, कोरोना विषाणूच्या ताज्या बातमीनुसार, वानखेडे स्टेडियमच्या ८ फिल्ड वर्कर्स कोरोना विषाणूच्या जाळ्यात सापडले आहेत. अहवालात असे म्हंटले आहे की वानखेडे स्टेडियमच्या १९ फिल्ड वर्कर्सची आरटी-पीसीआय चाचणी केली आहे. यामध्ये तीन जणांचा अहवाल आधीच आला होता, तर ५ जणांचा अहवाल १ एप्रिलला पॉझिटिव्ह आला आहे. याआधीही गेल्या वर्षी कोरोना व्हायरसमुळे IPL च्या १३ व्या सीझनचे आयोजन संयुक्त अरब अमिरात येथे आयोजित केले गेले होते.

IPL-१४ सुरु होण्याआधी एका आठवड्यातच कोरोनाचा विस्फोट
सुरवातीला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आलेले ग्राउंड कामगार त्यांना इतर ग्राउंड कामगारांपासून विभक्त करत आयसोलेशनमध्ये पाठविण्यात आले होते. कोरोना विषाणूचा नवीन विस्फोट IPL १४ वे सिझन सुरु होण्यापासून ठीक एक आठवडा आधी झाला आहे. पहिला सामना चेन्नईमध्ये मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यामध्ये होणार आहे. याआधी कोलकत्ता नाईट रायडर्सचे लेफ्ट हॅन्ड बॅट्समन नितीश राणा कोरोना पॉझिटिव्ह आढळले. तथापि, दोन दिवस आधी KKR व्यवस्थापनाने राणा कोरोनामधून बाहेर आल्याचे सांगितले आहे. यानुसार आता KKR च्या या फलंदाजांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.