Eknath Khadse | बालेकिल्ल्यातील पराभव एकनाथ खडसेंच्या जिव्हारी; म्हणाले – ‘भाजप-शिवसेनेची छुपी युती’

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – Eknath Khadse | राज्यातील 106 नगर पंचायतींपैकी 97 पंचायतींचे निकाल बुधवारी जाहीर झाले. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) 27 नगरपंचायतींवर वर्चस्व मिळवले असले तरी भाजपने (BJP) या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारल्याचे दिसत आहे. भाजपने सर्वाधिक 384 जागा मिळवल्या असून काँग्रेसला (Congress) मात्र फटका बसला आहे. तर दुसरीकडे शिवसेना (Shiv Sena) चौथ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. दरम्यान, बोदवड नगरपंचायतीसाठी (Bodwad Nagar Panchayat) अत्यंत चुरशीची निवडणूक झाली असून यामध्ये शिवसेनेने नऊ जागांवर विजय मिळवत नगरपंचायत ताब्यात घेतली. बालेकिल्ल्यात झालेला पराभव राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या जिव्हारी लागला आहे. निकालानंतर प्रतिक्रिया देताना निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची छुपी युती होती, असा आरोप केला आहे.

 

बोदवड नगरपंचायत निवडणूक निकालात (Bodwad Nagar Panchayat) शिवसेनेने 9, राष्ट्रवादी 7 जागा मिळाल्या आहे. महत्त्वाचे म्हणजे ईश्वरचिठ्ठीने एक जागा मिळवत भाजपने नगरपंचायतीत चंचू प्रवेश केला असल्याचे मानले जात आहे. जी जागा भाजपला मिळाली तेथे विरोधक म्हणून राष्ट्रवादीचा उमेदवार होता.

शेवटी पराभव तर पराभवच आहे –
निकालावर प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसे (Eknath Khadse) म्हणाले की, ”दोन जागांवर पराभव झाला आहे. एक जागा 6 मतांनी गमावली. तर दुसरी जागा ईश्वरी चिठ्ठीने गेली. शेवटी पराभव हा पराभवच असतो. या निवडणुकीत भाजप- शिवसेनेची छुपी युती होती. तीन दिवसांपूर्वीच शिवसेनेचे स्थानिक आमदार आणि गिरीश महाजन यांच्यात बैठक झाली होती. तसे वृत्तही छायाचित्रासह प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित झाले होते. केवळ राष्ट्रवादीचा पराभव करण्यासाठी सर्व पक्ष एकत्र आले होते. तरीही आम्हाला चांगले यश मिळाले आहे. ईश्वरीचिठ्ठीमुळे एक जागा गेली नाहीतर बहुमतापर्यंत आलो असतो. परंतु हा पराभव का झाला याचे चिंतन करणार असल्याचेही खडसे यांनी सांगितले.”

 

दरम्यान, राज्यातील 97 नगर पंचायतींचे निकाल जाहीर झाले असून यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने 27 नगरपंचायतींवर वर्चस्व मिळवले.
त्या पाठोपाठ भाजपने 22, काँग्रेस 21 तर शिवसेनेने 17 नगर पंचायतींवर झेंडा फडकविला आहे.
या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 384 जागा मिळवल्या तर राष्ट्रवादीने 344, शिवसेनेने 284 तर काँग्रेसने 316 जागा जिंकल्या आहेत.
असे असले तरी भाजप आणि राष्ट्रवादी हे दोघेही सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा करत आहेत.

 

Web Title :- Eknath Khadse | ncp leader eknath khadse claims that in bodwad shiv sena and bjp has hidden alliances in nagar panchayat election 2022

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा