नाथाभाऊंची तुफानी बॅटींग ; म्हणाले, ‘तिसरा नंबर मिळवायला भाग्य लागते’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विरोधी पक्ष नेतेपदी विजय वडेट्टीवार यांची निवड झाल्यानंतर बोलताना माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी तुफान बॅटींग केली. खडसे म्हणाले, विखे पाटलांनी या पदाचा आगळा वेगळा कार्यकाळ पार पाडला आहे. भाजपचे सरकार देशात आले त्यात राज्याच्या तेव्हाच्या विरोधी पक्ष नेत्याचाही खारीचा वाटा आहे.

असा चिमटाही खडसे यांनी काढला. (तेव्हा खडसे विरोधी पक्षनेते होते) विरोधी बाकावरुन सत्ताधारी बाकावर येणे, मंत्री होणे आणि सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन यांना हटवून तिसऱ्या नंबरची जागा मिळवणे याला भाग्य लागते, असे खडसे म्हणाले.

खडसे यांना मंत्री का केले नाही हे खडसे आणि मुख्यमंत्र्यांनाच माहिती आहे, असे अजित पवार म्हणाले होते. त्यावर खडसे म्हणाले, आमच्या दोघांचे काय ते ठरलंय. त्यावर अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी जे काय ठरलंय ते आता सभागृहात सांगू नका.असा सल्ला दिला त्यावर मुख्यमंत्रीही आपले हसू आवरु शकले नाहीत.

त्यावर जळगावचेच राज्यमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, जे काही आहे ते सांगून टाका, त्यावर खडसे यांनी ‘मी पण तेच म्हणतोय, तुमचे काय ठरलंय ते उध्दव ठाकरेंना विचारुन सांगून टाका ’ आणि त्यावर सभागृहात हास्याचा स्फोट झाला.

काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांची विरोधीपक्ष नेतेपदी निवड झाली तेव्हा सत्ताधारी बाकावर बसलेले माजी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी वडेट्टीवार यांची गळाभेट घेत शुभेच्छा दिल्या आणि सभागृहाने या अनोख्या भेटीचे स्वागत केले.

या सभागृहाला विरोधी पक्ष नेत्यांची मोठी परंपरा आहे. याआधी या पदावर एकनाथ शिंदे, राधाकृष्ण विखे यांनी चांगले काम केले असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अभिनंदनपर भाषणात म्हणताच, छगन भुजबळ म्हणाले, पाच वर्षात तीन विरोधी पक्ष नेते झाले. आता वडेट्टीवारांनाही तिकडे नेऊ नका म्हणजे झाले.

वरही हास्याचे फवारे उडाले.

काँग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी वडेट्टीवार यांच्याविषयी बोलताना विखे पाटील यांना नथीतून तीर मारला. ते म्हणाले, विरोधी पक्षनेत्याने सक्षमपणे काम केले पाहिजे, त्याने सरकारची धोरणे बदलवण्यास भाग पाडले पाहिजे, जनमत बदलण्याची क्षमता त्यांच्यात असते… त्यांच्या या प्रत्येक विधानाचा विखेंच्या दिशेने जाणारा रोख पाहून सभागृह त्यांना जोरदार प्रतिसाद देत होते.

पोलीसनामा ऑनलाइन

आतापर्यंत ५६ हजार गरजू रुग्णांना मुख्यमंत्री निधीतून मदत

व्यायामानंतर ‘या’ ७ चुका टाळा ; अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान

अमेरिकन डॉक्टरांनी केलं ‘ घड्याळाद्वारे ‘ हृदयरोगाचे निदान

शिक्षकांसाठी लवकरच ‘कॅशलेस आरोग्य योजना’