Eknath Khadse | ‘…तर माझ्या आयुष्याचं विमान लँड झालं नसतं,’ एकनाथ खडसे यांनी मानले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आभार

मुंबई : अचानक छातीत दुखू लागल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांची प्रकृती खुपच बिघडली होती. त्यांना तातडीने जळगावहून मुंबईला नेण्यासाठी एअर अ‍ॅम्ब्युलन्सची (Air Ambulance) आवश्यकता होती. यासाठी, काही सरकारी परवानगी मिळवण्याची मोठी अडचण होती. अखेर खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना फोन केला आणि खडसे (Eknath Khadse) यांना वेळेत मुंबईत हलविण्यात आले. आता खडसे पूर्णपणे बरे झाले असून त्यांनी मुख्यमंत्र्यांना फोन करून त्यांचे आभार मानले आहेत.

माझ्या आयुष्याचं विमान लँड झालंच नसतं, असे भावनिक उदगार एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्र्यांशी बोलताना काढले. एका मराठी वृत्तवाहिनीने हे वृत्त दिले आहे. रोहिणी खडसे यांनी फोन केला तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या साताऱ्यातल्या दरे गावात होते. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खडसेंसाठी एअर अँब्युलन्सची व्यवस्था केली.

एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी मुख्यमंत्र्यांना फोन करून म्हटले की, आपल्यासाठी छोटाच विषय होता.
आपल्या दृष्टिकोनातून बहुदा फार मोठाही नव्हता. मला एअर अँब्युलन्स मिळत नव्हती.
एक मिळाली ती नाशिकला उभीही होती. मात्र एटीसी क्लिअरन्स मिळत नव्हते. तुम्ही बोलल्यामुळे मिळाले. मी रुग्णालयात आलो.

ऑपरेशन थिएटरमध्ये मला नेले तेव्हा अँजिओप्लास्टीचा निर्णय घेतला. दोन ब्लॉकेज १०० टक्के आणि तिसरा ७०
टक्के होता. परिस्थिती गंभीर होती. पण त्यांनी अँजिओप्लास्टी केली. ती व्यवस्थित पार पडली.
कार्डिअ‍ॅक अरेस्ट आला.. माझं हृदय १०० टक्के बंद पडले. त्यावेळी दोन मिनिटांची शॉक ट्रिटमेंट दिली.

तुमचे विमान वेळेवर आले नसते तर माझे विमान टेक ऑफ झाले असते आणि लँड झालेच नसते. तुमचे आभार.
तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा!, असे भावनिक उदगार खडसे यांनी काढले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Imbalance Mental Health | Mental Health बिघडल्यास दिसतात ‘हे’ संकेत, त्यांचाकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात..!

Amitabh Bachchan Instagram Post – अमिताभ बच्चनने इंन्टाग्रामवर शेअर केली नातू अगस्त्यसाठी एक खास पोस्ट…

Low Blood Pressure | Mental Health बिघडल्यास दिसतात ‘हे’ संकेत, त्यांचाकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात..!

Ananya Panday Diwali Look | अनन्या पांडेने दिवाळी लूक शेअर करून नेटकऱ्यांच वेधलं लक्ष, व्हायरल फोटो पाहून चाहत्यांची हटेना नजर..