Eknath Shinde | गटनेतेपदावरून एकनाथ शिंदेंची हकालपट्टी?; म्हणाले – ‘आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Eknath Shinde | महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना आता वेग आला असल्याचे दिसत आहे. शिवसेना नेते व महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सध्या नाराज आहेत. त्यामुळे ते जवळपास 25 ते 30 आमदारांसह गुजरातमधील एका हाॅटेलमध्ये असल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. अशातच एकनाथ शिंदे यांनी प्रथमच एक ट्विट केलं आहे. या ट्विटमुळे राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे.

 

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही.” असं ते म्हणाले. दरम्यान याच ट्विटमुळे राजकीय घडामोडींना वेग आला असल्याची चर्चा आहे.

 

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या ट्विटमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) तसेच शिवसेनेचा (Shivsena) उल्लेख केला नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे भाजपसोबत जाणार का? अशा चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदावरून हकालपट्टी केल्यानंतर त्यांच्या जागी अजय चौधरी (Ajay Chaudhary) यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांना कोणतीही सहानुभूती दाखवली जाणार नाही, असा स्पष्टच संदेश दिल्याचे बोलले जात आहे.

 

दुसरीकडे त्यांची भूमिका समजावून घेण्यासाठी तसेच मुख्यमंत्र्यांच्या निरोप घेऊन मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) सुरतच्या दिशेने रवाना झाले आहेत.
त्यांच्यासोबत विकास फाटकही (Vikas Fataak) असल्याचे बोलले जात आहे.
तसेच महाराष्ट्रातील भाजपचे आमदार संजय कुंटे (MLA Sanjay Kunte) आणि एकनाथ शिंदे यांची सध्या सुरत हाॅटेलमध्ये बैठक सुरू आहे.
यानंतर एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार? याकडे सर्व राज्याचे लक्ष लागून आहे.

 

Web Title :- Eknath Shinde | Expulsion of Eknath Shinde from the post of group leader ?; Said – ‘We are Balasaheb’s staunch Shiv Sainiks …’

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा