Eknath Shinde Group | शिवसेना खासदारानं घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट, गटात सामील होणार का?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Eknath Shinde Group | शिवसेनेला लवकरच आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. यापूर्वी 40 आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे अद्याप न सावरलेल्या शिवसेनेला (Shivsena) लवकरच मोठा धक्का बसू शकतो अशी चर्चा आहे. आता शिवसेनेचा एक खासदार शिंदे गटात सामील होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. शिवसेना खासदार संजय जाधव (MP Sanjay Jadhav) यांनी आज पंढरपुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. (Eknath Shinde Group)

 

मात्र, जाधव-शिंदे भेटीनंतर परभणीचे शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी एक व्हिडीओ जारी करत म्हटले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना खासदार संजय जाधव यांची महापुजेदरम्यान झालेली भेट केवळ योगायोग आहे. (Eknath Shinde Group)

 

संजय जाधव हे वारकरी असून मागील 25 ते 26 वर्षांपासून आळंदी ते पंढरपूर पायी वारी करतात. पंढरपुरातील प्रत्येक शासकीय महापुजेला ते हजर असतात मग मुख्यमंत्री कुणीही असो. अगदी विलासराव देशमुख यांच्यापासून अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना देखील संजय जाधव शासकीय महापुजेला हजर होते. आजही याच कारणामुळे ते महापुजेला हजर होते. याचा कुणीही गैरअर्थ काढू नये. खासदार संजय जाधव हे निश्चितच उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत आणि राहतील.

काही दिवसांपूर्वीच शिवसेना खासदार राहुल शेवाळे (Shivsena MP Rahul Shewale) यांनी राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने भाजपाच्या उमेदवार द्रौपदी मूर्मू यांना पाठिंबा द्यावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. दरम्यान, शिवसेनेचे 12 खासदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केला आहे.

 

अशावेळी शिवसेना खासदार संजय जाधव यांनी आज पंढरपुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने
जाधव देखील शिंदे गटात सामील होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती,
परंतु जिल्हा प्रमुखांच्या स्पष्टीकरणाने या चर्चेला सध्यातरी पूर्णविराम मिळाला आहे.

 

Web Title :- Eknath Shinde Group | shivsena mp sanjay jadhav meet
chief minister eknath shinde in mahapooja ashadhi ekadashi pandharpur

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा