एल्गार परिषद : गाैतम नवलखा यांची नजरकैदेतून सुटका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
एल्गार परिषद प्रकरणातील सामाजिक कार्यकर्ते गाैतम नवलखा यांची नजरकैद संपवण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार आणि पुणे पोलीसांना मोठा धक्का बसला असून नवलखा यांना दिल्ली पोलीसांचा दिलासा मिळाला आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8f803d38-c57d-11e8-a839-4d421cc83e52′]

दिल्ली हायकोर्टाने सोमवारी त्यांची ट्रांजिट रिमांड याचिका रद्द करुन नजरकैद उठवली आहे. नवलखा यांची कस्टडी 24 तासांपर्यंत वाढवली आहे. मात्र, यामध्ये आणखी वाढ करण्याची परवाणगी देता येणार नाही असे, नजरकैद काढतेवेळी कोर्टाने म्हटले.

[amazon_link asins=’B072RJQSC8,B016OJ4ATW’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’aefb9ff9-c57d-11e8-8fc1-47c65d3deea7′]

एल्गार परिषद प्रकरणातील वरवरा राव, अरुण फरेरा, वरनॉन गोंसाल्विस, सुधा भारद्वाज आणि गौतम नवलखा हे 5 जण 29 ऑगस्टपासून स्वत:च्या घरात नजरकैदेत आहेत. त्यामधील नवलाखा यांची नजरकैद आता काढून घेण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्त्यांची नजरकैद काढण्यात यावी यासाठी एसआयटीकडून मागणी करण्यात आली होती. मात्र, सुप्रीम कोर्टाने गाैतम नवलखा सोडता सर्वांना लाल सिग्नल दाखवला.

इंडोनेशिया में 1300 शवों को दफनाने के लिए खोदी गई कब्र

दरम्यान, अटक करण्यात आलेल्या पाच जणांच्या अटकेची एसआयटी मार्फत चाैकशी करावी. अशी मागणी इतिहासकार रोमिला थापर यांच्याकडून करण्यात आली होती. मात्र, सुप्रीम कोर्टाने त्यांची मागणी फेटाळली आहे.

जाहिरात.