एम्फिसिमा म्हणजे काय ? जाणून घ्या ‘लक्षणं’, ‘कारणं’ अन् ‘उपाय’

एम्फिसिमा काय आहे ?

एम्फिसिमा हा एक प्रकरचा क्रॉनिक ऑबस्ट्रक्टीव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी) असतो. ज्यात फुप्फुसातील टीश्युची हानी होते. एम्फिसिमा श्वासोच्छावासाच्या अडचणींसाठी कारणीभूत असतो आणि एखाद्या व्यक्तीला व्यक्तीला विविध दैनंदिन क्रियांमध्ये आणि खेळांमध्ये गुंतण्यापासून रोखू शकतो. क्रॉनिक ब्रान्कायटीस आणि सतत खोकल्यासाख्या श्वसनाचे इतर त्रास यासोबत होऊ शकतात.

काय आहेत याची लक्षणं ?

– धाप लागणं
– श्वास घेता न येणं
– सतत खोकला येणं
– थकवा
– छातीच्या आकारात बदल (छाती वर येणं)
– ऑक्सिजनच्या कमतरतेमुळं त्वचेवर निळ्या रंगाची कातडी दिसणं

काय आहेत याची कारणं ?

– दीर्घकाळापर्यंत वायुजनित इरिटंट्ससोबत संपर्क
– धूम्रपान
– भयंकर वायुप्रदूषण
– दुर्मिळ प्रकरणात एम्फिसिमा अनुवांशिक असू शकतो.
– एम्फिसिमासाठी धूम्रपान हा सर्वात मोठा धोका असतो. सिगारेटच्या धुराच्या संपर्कात येणाऱ्यांनाही याचा धोका असू शकतो.

काय आहेत यावरील उपचार ?

एम्फिसिमाचे उपचार अद्याप उपलब्ध नाहीत, हा रोग केवळ लक्षणांद्वारे नियंत्रित केला जाऊ शकतो.

– फुप्फुसातील सूज कमी करण्यासाठी डॉक्टर अँटी इंफ्लेमेटरी औषधं पुरवू शकतात.
– छातीत संसर्ग झाल्यास अँटीबायोटीक्स दिले जाऊ शकतात. गंभीर प्रकरणात ऑक्सिजनची गरज भासू शकते.

काही प्रतिबंधात्मक उपाय पुढीलप्रमाणे-

– धूम्रपान करणं टाळा
– वायू प्रदूषणाच्या संपर्कात राहणं टाळा.
– ब्रिदींग मास्क वापरणं
– नियमित व्यायाम करा.
– छातीतील संसर्गाविरोधात संरक्षण मिळवण्यासाठी लस घ्या.