Ajit Pawar On Eknath Shinde | शिवसेना प्रमुख म्हणत अजित पवारांनी केलं एकनाथ शिंदेंचं कौतुक, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar On Eknath Shinde |राज्यात 2019 नंतर अनेक राजकीय घडामोडी (Maharashtra Political News) बघायला मिळाल्या. त्यामध्ये शिवसेनेने (Shiv Sena) महाविकास आघाडीसोबत सरकार (Mahavikas Aghadi Government) स्थापन केलं. त्यानंतर एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी समर्थक आमदारांना सोबत घेत शिवसेनेत मोठं बंड करुन भाजपच्या (BJP) मदतीने राज्यात सरकार स्थापन केलं. शिवसेनेतील फुटीनंतर पक्षात दोन गट पडले. शिवसेनेचा वाद सध्या कोर्टात आहे. मात्र, निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना पक्ष (Party) आणि चिन्ह (Symbol) शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अधिकृत शिवसेना एकनाथ शिंदे यांची असल्याचे बोलले जात आहे. यातच उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते (NCP) अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांचा उल्लेख शिवसेना प्रमुख (Shiv Sena Chief) केला आहे. अजित पवार यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय चर्चा रंगू लागली आहे. (Ajit Pawar On Eknath Shinde)

शिवसेनेत फूट पडल्यानंतर पक्षाच्या खात्यावर असलेली रक्कम (Party Amount) कोणाला मिळणार हा प्रश्न उभा राहिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात एक पत्र दाखवून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना टोला लगावला होता. त्यानंतर बाहेर आल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, अजित पवार यांनी उत्तर दिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. तसेच एकनाथ शिंदे यांचा उल्लेख शिवसेनेचे प्रमुख असाही केला. (Ajit Pawar On Eknath Shinde)

सुभाष देसाई (Subhash Desai) आणि अनिल देसाई (Anil Desai) यांनी ते पत्र लिहिलं होतं. शिवसेनेच्या लेटरपॅडवर ते
पत्र लिहिलं होतं, त्यावर चिन्हाचाही वापर केला होता. वास्तविक चिन्ह व पक्षाची जी जबाबदारी आहे, ती निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवली आहे. मात्र, मला त्या खोलात जायचं नाही, असे म्हणत अजित पवारांनी 50 कोटी रुपयांच्या पत्रावर प्रतिक्रिया दिली. त्यावेळी एकनाथ शिंदे त्यांच्या बाजूला उभे होते.

त्या पत्रातमध्ये असं सांगितलं होतं की, मागे काही डिपॉझिट ठेवलेलं होतं. ते डिपॉझिट चे पैसे आमच्याकडे वर्ग करा.
त्यामध्ये, शिवसेनेचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुठलेही आडेवेडे न घेता ते पैसे तिकडे वर्ग केले,
अशी माहिती अजित पवार यांनी स्वत: दिली. हे सांगताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शिवसेनेचे प्रमुख म्हटल्याचे
पाहायला मिळाले. शिवसेनेच्या प्रश्नावर अजित पवारांनी उत्तर दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | ‘ओळख लपवून मुलींशी लग्न अन् धर्मांतर…’, लव्ह जिहादविरोधी कायद्याच्या मागणीवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया (व्हिडीओ)

Samantha Ruth Prabhu | समंथा रुथ प्रभूने घेतले अभिनेत्याकडून उपचारासाठी पैसे? सोशल मीडियावर दिले उत्तर