… म्हणून ‘इंजिनिअर’ देखील घेतायेत ‘ITI’ला प्रवेश !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – विद्यार्थ्यांकडून सध्या विज्ञान सोडून इतर शाखा निवडण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक कल बदलत आहे. परंतू बदलत्या काळानुसार तरुण तरुणी आयटीआयला प्रवेश घेण्याचे प्रमाण वाढत आहे. कला, वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांचा कल या शाखेकडे असून नोकरी मिळवणे हा यामागील हेतू आहे.

ऐवढेच नाही तर इंजिनियरिंग पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांनी देखील आयटीआयला प्रवेश घेण्यात सुरुवात केली आहे. शासकीय, महापालिकेत नोकऱ्या मिळाव्यात यासाठी आयटीआयला प्रवेश घेणाऱ्यांचा कल वाढताना दिसत आहे. इंजिनियरिंग करणाऱ्या अनेकांना नोकऱ्या मिळत नसल्याने ते आयटीआयला प्रवेश घेऊन नोकऱ्यांच्या शोधात उतर आहेत.

इंजिनियर घेतायेत आयटीआयला प्रवेश
इंजिनियरिंगला प्रवेश मिळत नाही म्हणून अनेक मुली आयटीआयला प्रवेश घेण्याचे प्रमाण वाढले आहे. बीएड, डीएड या पदवीधर असलेल्या तब्बल २० टक्के विद्यार्थ्यांनी आयटीआयला प्रवेश घेतला आहे. इंजिनियरिंगला प्रवेश मिळणे कठीण असल्याने आणि त्यानंतर नोकऱ्या मिळण्यात अडचणी येत असल्याने इतर शाखेत आधीच पदवीधर असणारे देखील आयटीआयला प्रवेश घेत आहेत.

चांगले मासिक वेतन
आयटीआय करणाऱ्या विद्यार्थ्यांना मागील वर्षात २० ते २५ हजार मासिक वेतन असलेल्या नोकऱ्या मिळाल्या आहेत. चांगले प्लेसमेंट मिळाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कल आयटीआयकडे वाढत आहे. त्यामुळे प्रवेशासाठी स्पर्धा निर्माण झाली आहे. कमी कालावधीत आणि कमी खर्चात चांगल्या पगाराची नोकरी मिळत असल्याने विद्यार्थी आयटीआयला प्रवेश घेत आहेत.

आरोग्यनामा विषयक

‘पेनकिलर’ खात असाल तर ‘हे’ नक्की वाचा

‘मेकअप’ रिमूव्हसाठी बदाम तेल उत्तम

ऑफिसमध्ये जास्त वेळ खुर्चीवर बसताय मग बदला ‘या’ सवयी

‘गोड पदार्थ’ खाल्यावर लगेच ‘पाणी’ पिण्याने बिघडते आरोग्य

‘वजन कमी’ करण्यासाठी रात्री जेवत नसाल तर होईल ‘हे’ नुकसान

अंडरआर्म्ससाठी ‘डिओ’  विकत घेताना घ्या ‘ही’ काळजी

शरीराला ऊर्जा देणारी ‘खारीक’ ‘या’ आजारांनांही करते  दूर