पुण्यात कॅनॉलमध्ये बुडून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – शेवटचा पेपर झाल्यानंतर मित्रांसोबत कॉनोलला पोहण्यास आलेल्या एका इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांचा दुर्दैवी बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. रविवारी त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे.

जयेश रामराव भंडारे (वय 23, रा. वडगाव बुद्रुक) असे ठार झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयेश नर्‍हे परिसरातील एका महाविद्यालयात इंजिनिअरिंगच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत होता. शनिवारी त्याचा शेवटचा पेपर होता. पेपर झाल्यानंतर तो आणि त्याचे चार मित्र दुचाकीवरुन नांदेड परिसरातील कॉनोलला पोहण्यासाठी आले होते.

तत्पुर्वी कॉनोलमध्ये पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे पाण्याचा प्रवाह मोठा आहे. चौघेही पोहण्यासाठी उतरले. परंतु, पाण्याचा अंदाज न आल्याने जयेश पाण्याचा प्रवाहात वाहून गेला. मित्रांनी त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, पाण्याचा वेग जास्त असल्याने तो पाण्यात वाहून गेला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी पीएमआरडीए अग्निशमन दल आणि हवेली पोलिस ठाण्याला घटनेची माहिती दिली.

त्यानंतर पीएमआरडीएच्या जवानांनी त्याचा शोध घेतला. परंतु, रात्री उशिरापर्यंत शोध घेऊन तो मिळाला नाही. त्यानंतर पुन्हा रविवारी सकाळी शोध कार्याला सुरूवात केली. यावेळी घटनास्थळापासून सुमारे 800 मीटर अंतरावर जयशेचा मृतदेह आढळल्याची माहिती हवेली पोलिसांनी दिली.