ICC World Cup 2019 : भारताची विजयी घोडदौड अखेर इंग्लंडने रोखली ; ३१ धावांनी भारताचा पराभव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या चालू असलेल्या विश्वचषकामध्ये टीम इंडियाची चालू असणारी विजयी घोडदौड आज इंग्लंडने रोखली. आज इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारताला ३१ इतक्या धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे इंग्लंडने उभारलेला ३३८ धावांचा डोंगर भारतीय फलंदाजांना सर करण्यात अखेर अपयश आले.

रोहितची एकाकी झुंज अपयशी :

इंग्लंडने उभारलेल्या धावसंख्येला तोंड देताना सुरुवातीपासूनच भारतीय फलंदाजांनी कच खाल्ल्याचे दिसले. रोहितने शतकी खेळी करत १०२ धावा उभारल्या मात्र त्याला अन्य कोणत्याही फलंदाजाची साथ न लाभल्यामुळे भारताला एकही मोठी खेळी उभारता आली नाही. भारतीय फलंदाजी इतकी घसरली की एवढ्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असून देखील भारताकडून पहिला षटकार शेवटच्या शतकातील पहिल्या चेंडूवर धोनीने मारला.

पाकिस्तान स्पर्धेबाहेर :

या सामन्यातील इंग्लंडच्या विजयामुळे पाकिस्तानला मात्र मोठा धक्का बसला असून पाकिस्तान आता विश्वचषक स्पर्धेबाहेर पडला आहे.

इंग्लंडने मात्र नावाला साजेसा खेळ करत फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्हींमध्ये अप्रतिम खेळी करत विजय साकारला. आज विजयाचा निश्चय करून आल्याप्रमेच खेळी इंग्लंडने केली.

मधुमेहावर मिळवू शकता नियंत्रण, हे फार नाही अवघड

दिवसातील २४ तासांपैकी २३ तास तुमचेच, फक्त १ तास शरीरासाठी द्या

दीर्घ श्वास घेणे शरीरासह मेंदूसाठीही महत्त्वपूर्ण

जाणून घ्या : योग्य ‘परफ्युम’ची निवड आणि वापर कसा करावा