ICC World Cup 2019 : आजचा सामना न्यूझीलंड Vs इंग्लंडमध्ये, मात्र पाकिस्तानचा ‘जीव’ टांगणीला !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत आता रंगत आली आहे. अंतिम चार स्थानांसाठी पाच संघात जोरदार टक्कर होणार आहे. सध्या गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर असून भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर न्यूझीलंड तिसऱ्या स्थानी असून इंग्लंड चौथ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे स्पर्धेत आता चौथ्या क्रमांकासाठी रेस असून पाकिस्तानसह श्रीलंका देखील सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी आस लावून बसली आहे.

आज मैच न्यूजीलैंड-इंग्लैंड का, जान अटकी पाकिस्तान की, देखिए मजेदार ट्वीट

ऑस्ट्रेलिया आणि भारत यांनी सेमीफायनलमध्ये आपले स्थान पक्के केले असून त्याचबरोबर पाकिस्तानचे देखील सेमीफायनलमध्ये जाण्याचे चान्स वाढले आहेत. त्याचबरोबर या वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानच्या संघाने निराशाजनक कामगिरी करून आपल्या प्रेक्षकांना नाराज केलेले आहे. त्यांना सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी दुसऱ्या संघांच्या कामगिरीवर आणि जय पराजयावर अवलंबून राहावे लागणार आहे.

या स्पर्धेत पाकिस्तानला सेमीफायनलमध्ये प्रवेश करायचा असेल तर बांगलादेश विरुद्ध होणारा सामना मोठ्या फरकाने जिंकणे आवश्यक आहे. त्याचबरोबर इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या सामन्यात न्यूझीलंड पराभूत होण्यासाठी प्रार्थना करावी लागणार आहे. मात्र त्याआधीच सोशल मीडियावर इंग्लड आणि न्यूझीलंडच्या सामन्याआधी पाकिस्तानविषयी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात मिम्स व्हायरल होताना दिसून येत आहेत.

त्याचबरोबर मजेदार ट्विट देखील व्हायरल होत आहेत. आज इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात सामना होत असून २० करोड पाकिस्तानी चाहत्यांचे लक्ष लागून आहे. या सामन्यात न्यूझीलंड पराभूत होण्यासाठी पाकिस्तानी मोठ्या प्रमाणात प्रार्थना करताना दिसून येणार आहेत. पाकिस्तानी संघाप्रमाणेच चाहत्यांचा देखील जीव घशात येऊन अडकला आहे. याआधी भारताच्या आशेवर बसलेल्या पाकिस्तानला आता न्यूझीलंडच्या भरवशावर राहावे लागणार आहे.

..तर पाकिस्तान बाहेर

जर पाकिस्तानला सेमीफायनलमध्ये प्रवेश करायचा असेल तर आजच्या सामन्यात न्यूझीलंडला इंग्लडने मोठ्या अंतराने पराभूत करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर पाकिस्तानला बांगलादेशला मोठ्या फरकाने पराभूत करणे गरजेचे आहे. कारण पाकिस्तानचा रनरेट न्यूझीलंडपेक्षा खराब असल्याने त्यांना फक्त ही एकच गोष्ट सेमीफायनलमध्ये प्रवेश देऊ शकते.

ताण-तणाव दूर करून आनंदी जीवन जगा, ५ सोप्या पद्धती

विविध रंगाच्या बाटल्यांमधील पाणी प्या, आरोग्य सुधारेल

सर्दीची ‘अ‍ॅलर्जी’ का होते ? जाणून घ्या यामागील कारणे

भरपावसात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन

‘तारूण्य’ टिकवण्यासाठी हसत रहा, जाणून घ्या महत्वाचे फायदे

तुम्ही खात असलेले अन्न हे शरीर व मनासाठी आरोग्यवर्धक आहे का ?

पोलिसाच्या घरातच चोरट्यांनी केला हात साफ