‘निशब्द’ची ‘स्वतंत्र’, ‘निरागस’ जिया खान आज पुन्हा आठवली, सुसाईड नोटनं दिला होता ‘धक्का’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – निशब्द सिनेमातून बिग बी अमिताभ बच्चनसोबत बॉलिवूड डेब्यू करणाऱ्या अभिनेत्री जिया खाननं 25 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. आज जियाचा 35 वा वाढिदवस आहे. निशब्द सिनेमात तिनं स्वतंत्र आणि अतरंगी मुलीची भूमिका साकारली होती. जियानं 3 जून 2013 रोजी फाशी घेऊन आपलं आयुष्य संपवलं. परंतु तिनं कमी काळात खूप काही कमावलं होतं.

जाणून घेऊयात जियाबद्दल 10 गोष्टी

1) जियाचा जन्म न्यूयॉर्कमध्ये झाला होता. जियाचं बॉलिवूडशी जुनं नातं होतं. कारण तिची आई राबिया खान अमीन अ‍ॅक्टींग करायची. बॉलिवूड स्टार बनण्यासाठी जियानं अभिनय आणि इंग्रजी साहित्याचं शिक्षण घेतलं.

https://www.instagram.com/p/aJ9yVCKjTj/

2) रामगोपाल वर्माच्या निशब्द या सिनेमातून तिनं डेब्यू केला होता. एक लहान मुलगी एका म्हाताऱ्याच्या प्रेमात पडते अशी त्याची स्टोरी आहे. या सिनेमानं जिया रातोरात स्टार झाली. परंतु सिनेमानं खास काही कमाई केली नाही.

3) टॅलेंट पाहून आमिर खाननं जियाला गजनी सिनेमात संधी दिली. हा सिनेमा सुपरहिट ठरला. जियाच्या कामाचंही कौतुक झालं. यानंतर जियानं कॉमेडीच्या जगात पाऊल टाकलं. जिया साजिद खानच्या हाऊसफुल सिनेमात दिसली.

https://www.instagram.com/p/BRUvltVBQOe/

4) या सिनेमांनंतर अचानक समजलं की, जिया खाननं आत्महत्या केली. अद्यापही तिच्या मृत्यूवर सस्पेंस कायम आहे की, अखेर असं कसं झालं ?

5) जियाच्या मृत्यूनंतर तिची सुसाईड नोट खूपच चर्चेत राहिली. तिनं लिहिलं होतं की, मला कळत नाही की मी कसं सांगू परंतु आता सांगू शकते कारण आता गमावण्यासाठी काहीच शिल्लक राहिलं नाही. मी सगळं काही गमावलं आहे. तुम्ही जेव्हा ही नोट वाचत असाल तेव्हा मी जगातून गेलेली असेल. मी पूर्णपणे कोसळले आहे. तुला कदाचित जाणीव नसेल झाली परंतु तुझा माझ्यावर खूप परिणाम झाला आहे. एवढा की मी तुझ्या प्रेमात वेडी झाले. नंतर तू मला रोज टॉर्चर केलंस.”

https://www.instagram.com/p/B4S0Zp_hwLc/

6) जिया आणि सुरज पांचोली यांचं रिलेशन होतं. हे लेटर समोर आल्यानंतर सुरज पांचोलीला अटक झाली. परंत तो जामीनावर बाहेर आला. आताही ही केस कोर्टात सुरू आहे. जियाच्या आईनं सुरजवर आरोप केले आहेत. परंतु सुरजचं म्हणणं आहे की, तो निर्दोष आहे.

7) जिया लहानपणापासूनच उर्मिलाची फॅन होती. रंगीला पाहून ती खूप प्रभावित झाली होती. दिल से सिनेमात जियानं बाल कलाकार म्हणून रोल केला होता.

8) जियानं तसं तर तीन चारच सिनेमात काम केलं परंतु ज्या उत्साहानं ती बॉलिवूडमध्ये आली होती तसे रोल तिला मिळाले नाही. करिअरमुळेही ती डिप्रेशनमध्ये होती.

https://www.instagram.com/p/B2Ml6n-gc-0/

9) सुरज जेव्हा जेलच्या बाहेर आला तेव्हा त्यानंही सांगितलं की, जिया करिअरमुळं डिप्रेशनमध्ये होती. तिच्या मित्रांनीही तिची साथ सोडली होती. प्रत्येक लहान गोष्टीसाठी ती फोन करत असे. ती खूपच पजेसिव होती.

https://www.instagram.com/p/B2cVtcig_uO/

10) कारण काहीही असो परंतु एका निरागस मुलीला आपला जीव गमवावा लागला. हसरी, सुंदर आणि मासूम जिया आता परत येणार नाही तरीही चाहत्यांच्या मनात मात्र ती कायम जिवंत असणार आहे.