आलिया ‘पावरफुल’ ! पूर्ण केलं 70 किलो ‘डेडलिफ्ट’चं चॅलेंज (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची प्रसिद्ध आणि सुंदर सेक्सी अभिनेत्री आलिया भट्ट जिने कमी काळात चित्रपट सृष्टीत आपले नाव कमावले. तिच्या सुपरहिट चित्रपटांमुळे तिच्या चाहत्यांच्या संख्येत बरीच वाढ झाली आहे. आलियाने प्रत्येक चित्रपटात कौतुक करण्यासारखे काम केले आहे. जशी आलिया चित्रपटांमध्ये उत्तमरित्या आपली भूमिका पार पाडते तशीच खऱ्या आयुष्यातही ती प्रत्येक आव्हान अशीच स्विकारते.

अभिनेत्री आलिया भट्ट सोशल मीडियावर खूपच अँक्टिव्ह असते. आपले वेगवेगळे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे प्रत्येक फोटो चाहत्यांच्या पसंतीस पडतात. चाहते तिच्या फोटोला लाइक आणि कमेंट करत असतात. नुकताच आलियाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये तीने ७० किलोचे वजन उचचले आहे.

आलियाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तिच्या फिटनेस ट्रेनरने पोस्ट केला असून तिच्या कामाचे कौतुक केले आहे. या व्हिडिओला चाहत्यांच्या काही क्षणातच असंख्य प्रतिक्रिया आल्या आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –