‘गली बॉय’चं ऑस्करसाठी नामांकन, ‘अपना ऑस्कर आयेगा’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताने आज ९२ व्या ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकने जाहीर केली. यामध्ये रणवीर सिंग यांचा अप्रतिम अभिनय असलेला ‘गली बॉय’ हा सिनेमा भारताकडून पाठविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ‘बेस्ट इंटरनॅशनल फिचर फिल्म’ या कॅटेगरीसाठी गली बॉयची भारताकडून निवड करण्यात आली आहे.

गली बॉय या सिनेमाबरोबर अन्य बॉलीवूड चित्रपट ‘उरी द सर्जिकल स्ट्राइक’, ‘केसरी’, ‘बधाई हो’, ‘आर्टिकल १५’ आणि ‘अंधाधून’ हे चित्रपट ऑस्करच्या स्पर्धेत होते. मात्र यामध्ये गली बॉयने बाजी मारली आहे. गेल्या वर्षी भारताने ऑस्करसाठी ‘व्हिलेज रॉकस्टार’ची निवड केली होती.

गली बॉय ला मिळालेले पुरस्कार
दक्षिण कोरियातील २३ व्या बुकियॉन इंटरनॅशनल फॅन्टॅस्टिक फिल्म फेस्टिव्हलमध्ये नेटवर्क फॉर द प्रमोशन ऑफ एशियन सिनेमाचा पुरस्कारही गली बॉयला मिळाला होता. त्याचबरोबर मेलबर्नमध्ये पार पडलेल्या भारतीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये गली बॉयला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार देण्यात आला होता. ‘गली बॉय’ या सिनेमात रणवीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भट्टची प्रमुख भूमिका आहे. झोया अख्तरने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.

धारावीतील एका स्लम रॅपर्सच्या जीवनावर आधारित हा सिनेमा आहे. ‘गली बॉय’ या सिनेमात रणवीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भट्टची प्रमुख भूमिका असून झोया अख्तरने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. यापूर्वी झोया अख्तरने ‘लक बाय चान्स’, ‘जिंदगी न मिलेगी दोबारा’ आणि ‘दिल धडकने दो’ आदी सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे.

Visit – policenama.com