EPFO चा कोट्यवधी खातेदारांना अलर्ट ! सोशल मीडियावर कधीही शेयर करू नका ‘ही’ माहिती, अन्यथा होईल मोठं नुकसान; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था EPFO | सायबर गुन्हेगार (Cyber Crime) वेगवेगळ्या पद्धती वापरून लोकांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक करत आहेत. अशाच प्रकारच्या ओटीपी आणि इतर स्कॅमला आळा घालण्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) आपल्या कोट्यवधी खातेदारांना अलर्ट जारी केला आहे.

 

EPFO ने आपल्या अलर्टमध्ये म्हटले आहे की, EPF खात्याबद्दल महत्वाचा तपशील, वैयक्तिक माहिती किंवा OTP फोनवर किंवा ऑनलाइन शेयर करू नका.
EPF सदस्यांनी त्यांचा आधार कार्ड क्रमांक, पॅन, बँक खाते क्रमांक किंवा UAN क्रमांक इत्यादी माहिती WhatsApp किंवा सोशल मीडियावर (Social media) शेअर करू नये.
अन्यथा मोठा आर्थिक फटका बसू शकतो.

 

आपल्या सदस्यांना ट्विटरवर जारी केलेल्या मेसेजमध्ये ईपीएफओ ने म्हटले आहे की, ईपीएफओ सदस्यांना कधीही फोन करत नाही.
सोशल मीडियावर आधार, पॅन कार्ड, युएएन, बँक खाते किंवा ओटीपीसारखी वैयक्तिक माहिती शेअर करण्यास सांगत नाही.
या मेसेजसोबत ईपीएफओ ने एक ग्राफिक शेयर केले आहे ज्यात लिहिले आहे की, फसवणूक करणार्‍यांपासून सावध रहा!

 

ईपीएफओने म्हटले आहे की, ते व्हॉट्सअ‍ॅप किंवा सोशल मीडिया इत्यादीद्वारे कोणत्याही सेवेसाठी कधीही पैसे मागत नाहीत.
वैयक्तिक माहिती किंवा ओटीपी सामायिक करण्याची विनंती करणार्‍या कॉल किंवा मजकूरांना प्रतिसाद देऊ नका. यामुळे फसवणूक होऊ शकते.

 

कोणतीही शंका, संशयास्पद कॉल, मेसेज किंवा इतर समस्यांसाठी ईपीएफओ ची अधिकृत वेबसाइट www.epfindia.gov.in वर संपर्क साधा.
सदस्यांनी त्यांचे दस्तऐवज ऑनलाइन डिजिलॉकरवर सेव्ह करावेत.

 

Web Title : EPFO | epfo alerts social media users to not share their personal information like aadhar card number read in details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

MP Dr Amol Kolhe | राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हेंची ‘ती’ पोस्ट व्हायरल, राजकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ

खुशखबर ! Reliance Jio चा मोबाइल डेटा संपलाय का? वापरा कंपनीची ‘ही’ सर्व्हिस, तात्काळ मिळेल 5GB पर्यंत Loan

Multibagger Stock | 25 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या 3 स्टॉक्सने गुंतवणुकदारांना केले मालामाल, वर्षभरात मिळाला 14850% रिटर्न