8 कोटी पीएफ खातेधारकांना बसू शकतो ‘झटका’ ! व्याजदर घटणार, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था (ईपीएफओ) पीएफच्या व्याजदरात 8.65 टक्के घट करण्याची शक्यता आहे. EPFO 15 ते 25 आधार अंकांपर्यंत व्याजदर कमी करण्याची शक्यता आहे. असे झाल्यास याचा थेट परिणाम ईपीएफओच्या 8 कोटींहून अधिक भागधारकांवर होईल. नोकरदार वर्गांसाठी पीएफ भविष्यातील सुरक्षेचं मोठं माध्यम आहे. त्यामुळे व्याजदरात घट झाल्यास त्यांच्यावर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे.

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या रिपोर्टनुसार, अर्थ मंत्रालयाला याची चिंता आहे की, पीएफवर अधिक रिटर्न दिल्यावर बँकांना आकर्षक व्याजदर देणं शक्य होणार नाही ज्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होईल. रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, 2018-19 मध्ये निवृत्ती निधी व्यवस्थापकांनी अर्थ मंत्रालयासोबतच्या 7 महिन्यांच्या चर्चेनंतर आपल्या ग्राहकांसाठी 8.65 टक्क्यांचा दर निश्चित केला आहे.

पीएफचं व्याजदर घटावं ही बँकांचीही इच्छा

रिपोर्टनुसार, बँकांनीही म्हटलं आहे की, पीएफ सारख्या छोट्या बचत योजना आणि ईपीएफओनं जास्त व्याजदर दिल्यानं लोक त्यांच्याकडे(बँकांकडे) पैसे जमा करणार नाहीत त्यामुळे त्यांच्या(बँकांच्या) फंड जमा करण्यासाठीच्या समस्या वाढणार आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/