दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे झटके, घरातून बाहेर पडले लोक

वृत्तसंस्था – दिल्ली-एनसीआरमध्ये रविवारी सायंकाळी भूकंपाचे झटके जाणवले. भूकंपामुळे दिल्लीकर घराबाहेर पडले. रविवारी सायंकाळी 5.46 मिनीटांनी दिल्लीकरांना भूकंपाचे झटके जाणवले आहे. 3.5 richter स्केल तीव्रतेचे हे धक्के होते. नोएडा, गाझियाबादमध्ये देखील हे भूकंपाचे झटके जाणवल्यची माहिती समोर आली आहे. पुर्व दिल्ली भूकंपाचं केंद्र असल्याचं सांगण्यात आलं आहे

https://twitter.com/ANI/status/1249313395167440896a

यापुर्वी 20 डिसेंबर 2019 ला दिल्ली एनसीआरमध्ये भूकंपाचे झटके जाणवले होते. प्राथमिक माहितीनुसार जाणवलेल्या भूकंपात कोणत्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही. दरम्यान, भूकंपाच्या झटक्यानंतर लोकं भीतीमुळं घराबाहेर पडले. भूकंपाचे झटके जाणवण्यास सुरवात झाल्यानंतर काही कार्यालयातील कर्मचारी देखील ऑफीसच्या बाहेर पडले. दिल्ली सिसमित झोन 4 मध्ये येतं. हे क्षेत्र हिमालयाच्या खुपच जवळ आहे. संपुर्ण देशात लॉकडाऊन आहे. लोक आपआपल्या घरात आहेत. त्यामध्येच भूकंप झाल्यामुळे सर्वजण काही वेळासाठी घराबाहेर आले. मात्र, त्यामध्ये लोकांकडून सोशल डिस्टन्सिंगचं पालन होताना दिसून आलं.