Coronavirus : कशामुळं मारले जाणार 16 कोटीहून अधिक, ‘कोरोना’ची भविष्यवाणी केलेल्या शास्त्रज्ञानं सांगितलं

नवी दिल्ली :वृत्तसंस्था – आजपासून १४ वर्षांपूर्वी पहिलेच वैज्ञानिक Larry Brilliant ने सांगितले होते की, जगात कोणती पुढची महामारी खळबळ उडवणार आहे. हे तेच आहेत ज्यांनी स्मॉलपॉक्सला हरवण्याचा उपाय शोधला होता.

२००६ साली त्यांनी एका चर्चेदरम्यान म्हटले होते की, येणारी महामारीने तब्बल एक अरब लोकांचा जीव जाईल, तर १६ कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या संपुष्टात येईल. आजाराचा परिणाम अर्थव्यवस्थेवरही मोठ्या प्रमाणात होईल. नोकऱ्या जातील आणि यानंतर पूर्ण जगात नैराश्याचा काळ सुरु होईल. Larry यांची ही भविष्यवाणी त्यावेळी भीतीदायक होती की कोणी त्याकडे लक्ष दिले नाही. आता त्यांची भविष्यवाणी खरी झाली आहे. अशात Ending Pandemics चे चेयरमन आणि WHO सह संक्रमक आजारांवर काम करणाऱ्या Larry ने एका मुलाखतीदरम्यान अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. जाणून घेऊया या आजाराबद्दल हे वैज्ञानिक काय म्हणतात…

सन २००६ मध्ये आपण येणार्‍या महामारीविषयी बोलले होते आणि मदतीची मागणी केली होती. तुम्हाला मदत मिळू शकली?

हे पूर्णपणे होऊ शकत नाही. आमचा सगळा वैज्ञानिक विभाग सगळ्यांना याबाबत जागरूक करून देण्याचा प्रयत्न करत आहे. आजार येणार हे नक्की होते, फक्त कधी येणार हे माहित नव्हते. उदाहरणार्थ, राष्ट्रपती ट्रम्प यांनी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत ऍडमिरलला बाहेर केले, जे महामारीला थांबवण्यासाठी जबाबदार आहे. एडमिरलच्या जाण्याने त्यांच्यासह सगळे कर्मचारीही गेले.

याला novel व्हायरस म्हटले जात आहे. यामागे काय कारण आहे?
याचा अर्थ हा नाही कि हा व्हायरस काल्पनिक कथेतून आला आहे. याचा सरळ अर्थ असा कि हा व्हायरस नवीन आहे. पूर्ण जगात असा एकही माणूस नाही ज्यात या आजारासाठी इम्युनिटी असेल. इम्युनिटी त्याच्याच विरुद्ध येते, ज्याच्या विरुद्ध शरीराने एकदा सामना केला आहे. म्हणजे कोविड-१९ जगाच्या ७८० कोटी लोकांसाठी धोक्याचा आहे. नवीन असला तरी हा एक व्हायरस आहे. अनेक लोकं म्हणत आहेत की, एक बार बरे झाल्यावर पुन्हा पॉजिटीव्ह झाले, पण माझ्यामते वास्तविक संक्रमणाऐवजी चुकीचा निकाल आला असेल. ही आपल्या जीवनकाळात सर्वात भयानक महामारी आहे.

आम्हाला अनेक गोष्टी करण्यास सांगितले जात आहे, जसे कि एकत्र येणारे कार्यक्रम रद्द करणे. आम्हाला बरोबर सल्ला मिळत आहे का?

हा योग्य सल्ला आहे. दुर्दैवाने, आम्हाला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून पहिल्या १२ आठवड्यांत हा सल्ला मिळाला नाही. मी यापूर्वी कधीही निवडलेल्या अधिकाऱ्याला असे सांगताना पाहिले नाही. पण तुम्ही जे ऐकत आहात, जसे की स्वत: ला वेगळे ठेवणे, शाळेत किंवा कोणत्याही कार्यक्रमात न जाणे, समारंभ पुढे ढकलणे, हे अगदी ठीक आहे. आता प्रश्न येतो की यामुळे आपण पूर्णपणे सुरक्षित होऊ कि जग वाचेल? नाही, पण रोगाचा प्रसार थांबवायचा असेल तर हा एक चांगला मार्ग आहे.

सध्या आपण महामारी थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. याला वैज्ञानिक भाषेत flattening the curve म्हणतात. म्हणजे आम्ही आजाराला थांबवू शकत नाही पण त्याचा वेग कमी करू शकतो. यादरम्यान व्हायरसचा उपाय मिळू शकेल. याला १२ ते १८ महिन्यांचा वेळ लागेल.

याचा काय अर्थ आहे?
याचा अर्थ असा की, तोपर्यंत अनेक लोकं या महामारीमुळे मृत्यूमुखी पडली आहेत. आणि दुसरे म्हणजे तोपर्यंत आपल्याकडे याची लस असेल. म्हणजे या दोन्हीसह आपण आजाराशी लढण्यासाठी जवळजवळ ८० टक्के तयार होऊन जाऊ. मला अशा आहे की, कोविड-१९ साठी अँटिव्हायरल मिळेल, जे याचा उपचारही करू शकेल. निश्चित रूपाने हे विवादास्पद आहे आणि अनेक लोकं माझ्याशी सहमतही नसतील, पण माझे दोन शोध याची पुष्टी करतात जे Nature आणि Science पत्रिकेत २००५ साली छापलेलेही आहे. Covid-19 ला हरवण्याच्या युद्धात वैज्ञानिक काम करत आहेत यावर अशी लसही तयार होईल.

आम्ही कामासाठी परत कधी जाऊ शकू ?
सध्या तरी दक्षिण कोरियामध्ये एक चांगली खबर आहे की, त्यांच्याकडे आजही १०० पेक्षा कमी प्रकरणे आहेत. आपण चीनचे मॉडेल फॉलो करू शकत नाही. आपण लोकांना घरात बंद नाही करू शकत, पण कोरियाची पद्धत वापरू शकतो. आमच्या तपासणीची संख्या वाढवणे गरजेचे आहे.

जेव्हा आपण प्राथमिक चौकशीची संधी गमावली आहे, आता खूप उशीर झाला आहे काय?
अजिबात नाही. आता आपण तपासणी प्रकरणात stochastic पद्धत वापरायची गरज आहे. याचा अर्थ असा की, प्रोबॅबलिटी तपासली पाहिजे. आम्हाला माहित नाही कि व्हायरस कुठे-कुठे पसरला आहे. मिसिसिपीमध्ये कोणतेही प्रकरण नाही, कारण ते दिसत नाही. झिम्बाबवे मध्ये शून्य प्रकरणे आहेत कारण त्यांच्याकडे तपासायची सुविधा आहे. आता या व्हायरसच्या तापसणीमध्ये आपल्याला असे काहीतरी करायला पाहिजे जसे घरात गर्भधारणा चाचणीसारखे सहज केले जाऊ शकते.