सुडौल शरीरासाठी सकाळी २० मिनिटेतरी धावावे, ‘हे’ आहेत अन्य फायदे

पोलीसनामा ऑनलाईन टीम – आरोग्यासाठी सकाळी ताज्या हवेत धावणे खूप लाभदायक आहे. यामुळे शरीर सुडौल होतेच, शिवाय आत्मऊर्जा व मानसिक आरोग्यदेखील चांगले रहाते. तसेच हा व्यायाम प्रकार खुपच सोपा आहे. त्यासाठी विशेष प्रशिक्षण घ्यायचीही गरज नाही. रोज केवळ २० मिनिटे धावण्याचा सराव केल्यास आरोग्यावर सकारात्मक परिणाम दिसून येतो. या व्यायामामुळे शरीर सुडौल होत असले तरी त्याचे इतरही बरेच फायदे आहेत.

धावण्याच्या या व्यायामामुळे तुमचे बौद्धिक आरोग्य चांगले रहाते. उतारवयात बौद्धिक क्षमता आणि आरोग्य कमी होऊ लागते. अल्झायमर्ससारखा आजार सर्रास बळावताना दिसत आहे. त्यामुळे मेंदूच्या पेशींची क्षमता घटते. पळण्यामुळे अल्झायमर्स जरी बरा होत नसला तरी पेशींची घट रोखण्यास मदत होते. तणावमुक्ती हा देखील धावण्यामुळे होणारा मोठा फायदा आहे. धकाधकीच्या आयुष्यात मानसिक ताण वाढला आहे. धावण्यामुळे नोरेपाइनफ्राइनची मात्रा वाढते. हे संयुग मेंदू व शरीराला एकताळ्यात ठेवते. तसेच धावण्याच्या व्यायामामुळे आत्मविश्वास व आत्मसन्मान देखील वाढतो.

याचा आणखी एक लाभ म्हणजे मूड सुधारतो. संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की, धावण्यामुळे आपला मूड सुधारतो. धावल्यामुळे झोपदेखील शांत लागते. किमान ७-८ तासांची झोप गरजेची असते. धावल्याने झोपेचे वेळापत्रक व्यवस्थित होते. नियमित धावण्याच्या सरावामुळे चांगली झोप लागते. अशाप्रकारे दररोज सकाळी ताज्या हवेत केवळ वीस मिनिटे धावल्यास शरीर सुडौल होतेच शिवाय अन्य अनेक फायदे होतात.