शिवसेनेनं जनतेच्या जनादेशाचा विश्वासघात केला : देवेंद्र फडणवीस

हर्षवर्धन पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवणार

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) – महाराष्ट्रात आजपर्यंत कोणत्याही पक्षाला विधानसभेच्या 70 टक्के जागा जिंकता आलेल्या नाहीत. पण भारतीय जनता पक्षांने राज्यात 70 टक्के जागा जिंकल्या. पण दुर्दैवाने ज्यांना आपण सोबत घेतले त्या शिवसेनेने जनतेने दीलेला जो काही जनादेश होता त्या जनादेशाशी विश्वासघात करून सरकार स्थापन केले असल्याचे मत महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंदापूर येथे बोलताना व्यक्त केले.

रविवार दि. 8 डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस हे कुलदैवत श्री. क्षेत्र नरसिंहपूर येथील देवदर्शन व सायंकाळी टेंभुर्णी येथे विवाह सोहळ्याच्या निमित्ताने मुंबईवरून इंदापूर येथे आले होते. दुपारी दोन वाजता देवेंद्र फडणवीस यांचे कुलदैवत श्री. क्षेत्र नरसिंहपूर येथे आगमन झाले. त्यांनतर देवदर्शन करून फडणवीस हे दुपारी 3:30 वाजता इंदापूरकडे रवाना झाले.सायंकाळी पाच वाजता इंदापूर येथे हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापूर येथील भाग्यश्री बंगला येथे आगमन होताच माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी फडणवीस यांचे स्वागत केले. यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, दौंडचे आमदार राहुल कुल, माळशिरसचे आमदार राम सातपुते, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी, माजीमंत्री बाळासाहेब भेगडे, माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख, कल्याणराव काळे हे उपस्थित होते.
Devendra Fadanvis

यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कालही मी बोललो होतो की आम्ही 70 टक्के मार्क घेवुन वर्गात पहिले आलो. पण 40 टक्के मार्क घेणारे तीघे लोक एकत्र आले आणि त्यांनी आमच्यापेक्षा जास्त मार्क दाखवून मेरिटमध्ये आल्याचा दावा केला. पण मला असे वाटते की अशा प्रकारची सत्ता जास्त काळ टीकणार नाही. येत्या काळात आपल सरकार निश्चित येइल. आता संपूर्ण महाराष्ट्र भाजपमय करा. या संधीचा फायदा घेवून संपूर्ण महाराष्ट्र भाजपमय केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. हर्षवर्धन पाटील यांना या लढाईत पूणे जिल्ह्यापुरते व पश्चिम महाराष्ट्रा पुरते मर्यादीत न ठेवता त्यांना राज्यपातळीवरील जबाबदारी देणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगीतले.

हर्षवर्धन पाटील यांनी विधानसभेला प्रचंड मोठी लढत दीली. खरं तर एक लाख बारा हजार इतकी मते मिळविणारा उमेदवार विजयीच होत असतो. परंतु 1500 ते 1600 मते त्यांना कमी पडली ही मते जर हर्षवर्धन पाटलांना मिळाली असती तर आजचे चित्र वेगळे दीसले असते.परंतु याबाबतची खंत करत बसण्याचे कारण नाही. हर्षवर्धन पाटलांसारखा प्रदीर्घ अनुभव असणारा अनुभवी माणूस आमच्या सोबत आल्यामुळे त्यांच्या अनुभवाचा फायदा आम्हाला होणार असुन थोडी मते कमी पडली म्हणून कोणी खचुन न जाता संपुर्ण ताकदीनिशी उतरा. भविष्यकाळ आपलाच असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगीतले.

Devendra Fadanvis

यावेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले की राजकीय परिस्थितीच्या अपयशापैकी आमचा तालुका थोडा कमी पडला. मावळातून बाळा भेगडेही थोडे कमी पडले. याचे शल्य आमच्या मनात आहे. आणखी 10-12 जागा निवडून आल्या असत्या तर आज राज्यातील चित्र वेगळे दिसले असते. याबाबत पहिल्यांदा मी दिलगीरी व्यक्त करतो. तुम्ही आमच्यावर विश्वास टाकला परंतु दुर्दैवाने आम्ही थोडे कमी पडलो, त्यामुळे आज दुर्दैवाने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु इंदापूर तालुका स्वाभिमानी आहे. या तालुक्याने कधीच वेडेवाकडे काम केलेले नाही व तशी सवयही नाही. आम्ही एवढीच प्रार्थना करतो की तुम्ही पुन्हा आपल्या पुर्वीच्या जागेवर यावे. मी भाजपमध्ये गेल्यानंतर बदलायचे नाही ही भुमिका इंदापूर तालुक्यातील मतदारांनी घेतली. त्याबद्दल मतदारांचे आभार मानत असल्याचे हर्षवर्धन पाटील म्हणाले. यावेळी बाळासाहेब गावडे, कष्णाजी यादव, भरत शहा, युवराज मस्के, पांडूरंग (तात्या) शिंदे, विलास वाघमोडे, नानासो शेंडे, मयुरसिंह पाटील, मंगेश पाटील, कांतीलाल झगडे, कैलास कदम, वसंतराव मोहोळकर, मोहनराव दुधाळ, राहुल जाधव, राजू गार्डे इत्यादी प्रमुख उपस्थित होते.

Visit : Policenama.com