ताजमहलात गेले नाही दिवंगत Ex Pm ‘अटल’जी ना लिहिला ‘अभिप्राय’, पोलीस अधिकार्‍याला सांगितलं की ‘माझी कविता वाच’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जेव्हा कोणी राष्ट्रप्रमुख भारत दौर्‍यावर येतात तेव्हा ताजमहल पाहण्यासाठी खुप उत्सुक असतात, परंतु देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी दोन वेळा आग्रा येथे आले, परंतु ते ताजमहलच्या मुख्य घुमटाच्या आतमध्ये गेले नाहीत आणि त्यांनी भेट देणार्‍यांच्या नोंदवहीत आपला अभिप्रायही लिहिला नाही. परंतु, त्यांची कविता ताजमहलबाबत खुप काही सांगते.

ही गोष्ट 43 वर्षापूर्वीची आहे, जेव्हा ब्रिटिश पंतप्रधान लियोनार्ड जेम्स केलघन 1977 मध्ये ताजमहल पाहण्यासाठी आले होते. तेव्हा परराष्ट्र मंत्री म्हणून अटल बिहारी वाजपेयी हे त्यांचे स्वागत करण्यासाठी ताजमहल येथे पोहचले. ब्रिटिश पंतप्रधानांसोबत अटल बिहारी वाजपेयी यांनी व्हिजिटर बुकमध्ये सही केली, पण कोणताही अभिप्राय लिहिला नाही.

त्यावेळी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) विभागाचे वरिष्ठ संरक्षण सहायक असलेले डॉ. आरके दीक्षित यांनी अटलजींना अभिप्राय लिहिण्यासाठी आग्रह केला असता ते म्हणाले, ताजमहलवर लिहिलेली माझी कविता वाचावी.

अटलजींची कविता ना ताजमहलच्या सौंदर्यावर आहे, आणि ना मुमताजसाठीच्या शाहजहानच्या प्रेमावर अधारित आहे. ही कविता त्या श्रमिक कामगारांसाठी आहे ज्यांनी ही भव्य इमारत उभारली आहे. या
कवितेच्या काही निवडक ओळी पुढील प्रमाणे –

“यह ताजमहल, यह ताजमहल
यमुना की रोती धार विकल
कल कल चल चल
जब रोया हिंदुस्तान सकल
तब बन पाया ताजमहल
यह ताजमहल, यह ताजमहल..!!”

अटल बिहारी वाजपेयी यानंतर पंतप्रधान म्हणून 15 जुलै 2001 ला पाकिस्तानचे राष्ट्रपती परवेज मुर्शरफ यांच्या सोबत आग्रा येथे आले होते, परंतु त्यावेळी सुद्धा ते ताजमहलच्या आत गेले नाहीत.