Exercise During Periods | पीरियड्समध्ये एक्सरसाइज करणे महिलांसाठी किती फायदेशीर? एक्सपर्टकडून जाणून घ्या

नवी दिल्ली : Exercise During Periods | एक्सरसाइज करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यामुळे अनेक प्रकारचे आजार टाळता येतात. डॉक्टर दिवसातून किमान १५ मिनिटे एक्सरसाइज करण्याचा सल्ला देतात. परंतु, महिला मासिक पाळीदरम्यान एक्सरसाइज करणे टाळतात. मात्र, डॉक्टर सांगतात की, मासिक पाळीदरम्यान हलका वर्कआऊट करू शकता (Exercise During Periods).

जर स्त्रीला कोणतीही समस्या नसेल आणि गंभीर आरोग्य समस्या नसेल तर ती एक्सरसाइज करू शकते. याचा शरीराला फक्त फायदाच होतो. पीरियड्स दरम्यान महिला कोणत्या प्रकारचे वर्कआउट करू शकतात आणि त्यांचे काय फायदे आहेत हे जाणून घेऊया.

मासिक पाळी दरम्यान एक्सरसाइज करता येते, पण ती खूप कमी तीव्रतेचा असावी. मासिक पाळी दरम्यान दररोज एक्सरसाइज करण्याची आवश्यकता नाही. मध्येच एक दिवस योगासने सुद्धा करू शकता. यामुळे मासिक पाळीत दरम्यान पेटके आणि सूज यापासून आराम मिळेल. (Exercise During Periods)

फील-गुड हार्मोन्सची पातळी वाढवते

डॉक्टर सांगतात की, पीरियड्सच्या काळात शरीरात अनेक प्रकारचे बदल होतात, जे एक्सरसाइजने कमी करता येतात. एक्सरसाइज केल्याने शरीरात फील-गुड हार्मोन्सची पातळी वाढते. यामुळे मूड चांगला राहतो. मानसिक ताण कमी होतो.

मात्र, या काळात फक्त तिच एक्सरसाइज करा जी आरामात करू शकता. मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी हे टाळावे. कारण या दिवशी हेवी फ्लो असतो. अशावेळी वर्कआउट करणे योग्य नाही.

पीरियड्समध्ये करू शकता या एक्सरसाइज

वॉकिंग हा एक सोपा व्यायाम आहे. हे घरी किंवा बाहेर कुठेही करता येते.
वॉकिंग हळुहळु करा आणि किमान १० ते १५ मिनिटे करा. यासोबतच हलकी एरोबिक एक्सरसाइज सुद्धा करू शकता. मात्र पीरियड्समध्ये पोटात तीव्र वेदना होत असतील तर एक्सरसाइज टाळा. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

या गोष्टी लक्षात ठेवा

मासिक पाळीत बराच वेळ एक्सरसाइज करू नका. अर्ध्या तासात एक्सरसाइज पूर्ण करा.
दीर्घकाळ करणे हानीकारक ठरू शकते. एखादा आजार असेल तर
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच एक्सरसाइज करा. स्वतःहून कधीही हेवी वर्कआउट करू नका.
असे करणे हानिकारक ठरू शकते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Hair Loss | पुरुषांचे अकाली पडतेय टक्कल, हेयरफॉलची ‘ही’ 5 कारणं, जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला,
केसगळतीला लागेल ब्रेक

Dirty Bedsheet | तुम्ही सुद्धा खुप दिवसांपासून बेडशीट धुतलेले नाही का? निष्काळजीपणा पडू शकतो महागात,
होऊ शकतात 5 मोठे आजार

Acne Pigmentation | मुरूम-फुटकुळ्या ताबडतोब होतील क्लीन बोल्ड, 5 सिम्पल फॉर्म्युले करा फॉलो,
गॅरंटीने होतील दूर